पुणे : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर सरकारवर निशाणा साधला. महाविकास आघाडीला सत्तेतून घालवायचं हा नव्या वर्षांचा संकल्प असल्याचं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. तसंच येत्या वर्षात रिपब्लिकन पक्षाची ताकद वाढवायची आहे, असंही रामदास आठवले म्हणाले.
राज्यातील १० मंत्र्यांना, २० आमदारांना कोरोनाची लागण; अजित पवारांची धक्कादायक माहिती
आपल्या हटके कवितांसाठी ओळखले जाणारे रामदास आठवले यांनी नववर्षाचं स्वागत करतानाही आपल्या खास अंदाजात कविता सादर केली. “आज मला झाला हर्ष…कारण आज आमच्या समोर उभं आहे २०२२ चं वर्ष”, असं म्हणत रामदास आठवले यांनी सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. ते आज कोरेभाव भीमा येथे आले होते.
रामदास आठवले यांनी २०२२ मध्ये रिपब्लिकन पक्षाला मजबूत करणं हा देखील संकल्प असल्याचं यावेळी सांगितलं. “कोरेगाव भीमला मी भेट दिली आहे. आमच्यासाठी हा महत्त्वाचा दिवस आहे. शौर्यदिन आहे. नवीन वर्षाचा संकल्प हा महाविकास आघाडी सरकार घालवणं हाच आहे. तसंच रिपब्लिकन पक्षाला मजबूत करणं आणि आमचं संघटन वाढवणं हा देखील संकल्प आहे”, असं रामदास आठवले म्हणाले.
Read also:
- राज्यात लॉकडाऊन लागणार नाही, परंतू निर्बंध अजून कडक करणार – राजेश टोपे
- पंढरपुरात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांत जोरदार खडाजंगी; दोन्ही गट आमने-सामने
- आम्ही तोंडातून वाफा काढत नाही, जे बोलतो ते करतो; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधकांना सुनावलं
- मुंबईकरांना ठाकरे सरकारकडून नववर्षांचं मोठं गिफ्ट; 500 स्क्वेअर फूट पर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ
- सूडबुद्धीने गुन्हे दाखल करून नारायण राणेंना नमवण्याचा प्रयत्न; रावसाहेब दानवेंचा गंभीर आरोप