पंढरपूर : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांत जोरदार वाद झाला आहे. पंढरपुरात भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्ये यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचा घोषणाबाजीने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी मंदिर परिसरात बराच काळ बघ्यांची गर्दी सुद्धा झाली होती.
ऐनवेळी बैलगाडा शर्यत रद्द करण्यामागे राजकीय डाव; शिवाजीराव आढाळराव पाटलांचा रोख कुणाकडे?
भाजप अध्यात्मिक आघाडी प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले हे पंढरपुरात मंदिरात दर्शनाला आले. यावेळी तुषार भोसले यांच्या अंगावर काळे टाकण्यासाठी राष्ट्रवादी काँगर्सेचे कार्यकर्ते आले होते. त्यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी त्यांना रोखले आणि मग भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्यांत जोरदार बाचाबाची झाली. आचार्य तुषार भोसले यांनी नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. या नंतर संतप्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आचार्य तुषार भोसले यांचा विरोध करत त्यांच्या अंगावर काळे टाकण्याचा प्रयत्न केला.
राज्यातील १० हजार कर्मचाऱ्यांचे परतीचे दोर तुटले; एसटीचे १० हजार कर्मचारी थेट निलंबित
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युवक प्रदेश सचिव आणि भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना रोखले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या गळ्यातील पंचा काढून भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी कार्यकर्त्यांना हिसकावून दिले. मंदिर परिसरात बराच वेळ बघ्यांची गर्दी झाली होती. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने तसेच कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीमुळे मंदिर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
“गल्लीत क्रिकेट जिंकणाऱ्यांकडून वर्ल्डकपवर दावा करणे हे हास्यास्पद “
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे संदीप मांडवे यांनी सांगितलं, नववर्षानिमित्त श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी आम्ही येथे आलो होतो. यावेळी भाजपचे तुषार भोसले हे आले होते. त्यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी माहिती नसताना शरद पवारांवर टिप्पण्णी केली होती. यामुळे आम्ही तुषार भोसले यांना शरद पवारांचे ‘लोक माझे सांगाती’ हे पुस्तक भेट देण्यासाठी आम्ही गेलो होतो. तेथे भाजपचे 15-20 पदाधिकारी होते. त्यांनी आगाऊपणा करत घोषणाबाजी सुरू केली. आमच्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी धक्काबुक्की केली. आम्हाला आंदोलन करायचं असतं तर आम्ही आणखी कार्यकर्ते घेऊन गेलो असतो पण आम्ही दर्शनासाठी गेलो होतो आणि गाडीत असलेले पुस्तक आम्ही देत होतो.
Read also:
- आम्ही तोंडातून वाफा काढत नाही, जे बोलतो ते करतो; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधकांना सुनावलं
- मुंबईकरांना ठाकरे सरकारकडून नववर्षांचं मोठं गिफ्ट; 500 स्क्वेअर फूट पर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ
- सूडबुद्धीने गुन्हे दाखल करून नारायण राणेंना नमवण्याचा प्रयत्न; रावसाहेब दानवेंचा गंभीर आरोप
- केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या हातात वाघाची शेपटी; व्हायरल पोस्टव्दारे शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न
- राज्यातील १० मंत्र्यांना, २० आमदारांना कोरोनाची लागण; अजित पवारांची धक्कादायक माहिती