मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज अधिवेशनात लक्ष्यवेधी मांडताना ठाकरे सरकारवर गंभीर आरोप लावले आहेत. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. सरकारी वकिलांमार्फंत गिरीश महाजनसह मला अडकवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यांसंदर्भातील एक पेन ड्राईव्ह देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा उपाध्यक्षाकडे दिला आहे. त्यात अनेक गोष्टी असून त्या सर्व देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितल्या आहेत.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार हे पोलीस दलाचा गैरवापर करीत असून या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीबीआयकडे सोपवण्यात यावा, अशी मागणीही यावेळी त्यांनी केली. आम्हाला अडकवण्यासाठी खोटी प्रकरणे तयार करण्यात आली असून खोटे पंच आणि खोटे साक्षीदार आमच्या विरोधात उभे करण्यात आले असल्याचे गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केले आहेत.
मोठी बातमी ! संजय राऊतांच्या पत्रकार परिषद पुर्वी शिवसेना युवानेत्यांच्या घरी आयकर विभागाची धाड
पेनड्राव्हई मी अध्यक्षांना सुपुर्द करत आहे. सरकार कशा प्रकाराचे कटकारस्थान शिजवत आहेत ते मी या पेनड्राईव्हमध्ये दिले आहे. गिरीश महाजनांच्या संदर्भात पुण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला होता. 2018 मध्ये मराठा शिक्षण प्रसारक मंडळाच्या भोईटे गटाच्यावतीने गिरीश महाजनांचे स्वीय सहाय्यक रामेश्वर यांनी पाटील गटाच्या व्यक्तीचे अपहरण केले. त्यानंतर महाजनांचा फोन आला आणि त्यांनी धमकी देण्यात आली. अशा प्रकारे खोटी केस दाखल करून गिरीश महाजन यांना अडकवण्यात आला, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, देशामध्ये लोकशाही असून महाराष्ट्र पुरोगामी राज्य असल्याचे आपण म्हणतो. महाराष्ट्रातल्या राजकीय संस्कृतीमध्ये आपण एकमेकांचे विरोधक आहोत. परंतु शत्रु नाहीत. महाराष्ट्राची पोलीस व्यवस्था ही प्रगल्भ आहे. त्याचा मला अभिमान आहे. परंतु अलिकडेच त्यांचा गैरवापर होत असल्याचाही आरोप फडणवीस यांनी केला आहे.
Read also:
- मग नारायण राणेंचा राजीनामा का घेतला नाही, नवाब मलिकांवरील कारवाई अयोग्य- शरद पवार
- फोन टँपिंग प्रकरणावर उपमुख्यमंत्र्याचं संजय राऊतांना प्रत्युत्तर, म्हणाले…
- गोव्याच्या रश्मी शुक्ला कोण? संजय राऊतांनी केंद्रीय यंत्रणांचे काढले वाभाडे
- महाराष्ट्र पॅटर्नचे जे प्रमुख होते, तेच निवडणूक काळात गोव्यात; फोन टँपिंगवरून संजय राऊतांचा टोला
- आर्यन खान प्रकरणात शिवसेना, काँग्रेस मंत्र्यांचा समावेश; मोहित कंबोज यांचा खळबळजनक दावा