पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवाब मलिक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्याबाबत भाष्य केले. नवाब मलिक यांच्या वर चुकीचे पद्धतीने कारवाई झाल्याचे त्या म्हणाले. तर रशिया युक्रेन युद्धाबाबत बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील निशाणा साधला.
नवाब मालिक राजीनामा द्या; विधानसभेच्या आवारात भाजपकडून स्वाक्षरी मोहीम
नवाब मलिक यांच्यावर चुकीच्या पद्धतीने कारवाई केली जात आहे. त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर यातना देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांच्यासोबत आम्ही सर्व आहोत. माझे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहकारी नारायण राणे यांना अटक करण्यात आली होती. त्यावेळी त्यांचा राजीनामा घेतल्याचे माझ्या काही निदर्शनास आले नाही. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येताहेत. त्यावर ते चर्चा करतील. परंतु जो न्याय तुम्ही नारायण राणे यांना दिला.. तोच न्याय नवाब मलिक यांना का दिला जात नाही असा सवालही शरद पवार यांनी उपस्थित केला आहे.
नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्याला राष्ट्रवादी करणार जोरदार विरोध; विराट मूक मोर्चाचे आयोजन
युक्रेन मध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना भारतात आणण्यावरून सध्या राजकीय घडामोडी घडत आहेत. त्यामुळे देशातील कोणत्याही नेत्यांनी सध्या विद्यार्थ्यांवर राजकारण करण्याची वेळ नाही. तसेच माझं यासंदर्भात परराष्ट्र मंत्र्यांशी देखील बोलणं झाल्याचं त्यांनी सांगितले. रशिया युक्रेन युद्धावर युएनमध्ये झालेल्या बैठकीत भारताने तटस्थ भूमिका घेतली ती योग्य नसल्याचे यावेळी शरद पवारांनी सांगितले.
मनोज कटके हल्ला प्रकरण; देवेंद्र फडणवीसांचा पोलिसांना इशारा, म्हणाले…
उद्या 6 मार्च ला पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येत आहे. यावेळी त्यांच्या हस्ते गरवारे कॉलेज येथील पुणे मेट्रो स्टेशनचे उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यावरून बोलताना ते म्हणाले की, उद्घाटनापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेन मध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढावं. असा टोला देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शरद पवारांनी लगावला.
Read also:
- फोन टँपिंग प्रकरणावर उपमुख्यमंत्र्याचं संजय राऊतांना प्रत्युत्तर, म्हणाले…
- गोव्याच्या रश्मी शुक्ला कोण? संजय राऊतांनी केंद्रीय यंत्रणांचे काढले वाभाडे
- महाराष्ट्र पॅटर्नचे जे प्रमुख होते, तेच निवडणूक काळात गोव्यात; फोन टँपिंगवरून संजय राऊतांचा टोला
- आर्यन खान प्रकरणात शिवसेना, काँग्रेस मंत्र्यांचा समावेश; मोहित कंबोज यांचा खळबळजनक दावा
- विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीसाठी अजितदादांचं राज्यपालांना साकडं; कोश्यारी निर्णय घेणार?