मुंबई : गेल्या महिनाभरापासून महाविकास आघाडी विरुद्ध भारतीय जनता पक्ष असा संघर्ष काहीसा पेटलेला दिसत आहे. दिवसेंदिवस या संघर्षाची धार वाढताना दिसत आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप संघर्षात एकमेकांची उणीदुणी काढण्यात आता नेत्यांना रस आलेला आहे.
तुमच्या सारखा समजुतदार नेता…; भुजबळांनी विधानसभेत फडणवीसांचं केलं कौतुक
अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचे दहशतवादी आणि देशद्रोही दाऊद इब्राहीमशी व्यवहार असल्याच्या ठपक्यावरून ईडीने त्यांच्यावर कारवाई केली आहे आणि त्यांना अटक करण्यात आलेली आहे. सध्या त्यांची तब्येत काहीशी खराब असल्याने त्यांना जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाले आहे आणि आज अधिवेशनाचा दुसरा दिवस सुरु आहे. पहिला दिवस हा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यावरून वादळी ठरणार होता मात्र राज्यपाल भगतसिंह कोषारी यांनी केलेल्या विधानामुळे भाजप काहीसा बॅकफूटवर गेला होता. राज्यपाल अर्ध्याभाषणातून निघून गेल्याने विरोधी पक्षाला काय करावे हे कळलेच नाही.
ओबीसी आरक्षणाला राज्य सरकारचा धक्का नाही धोका; पंकजा मुंडे राज्य सरकारवर कडाडल्या
मात्र आजच्या दिवशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी नवाब मलिक यांच्या राजीनाम्याचा मुद्दा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच उचलून धरला आहे. आज नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्यासाठी विशेष मोहीम विधानसभेच्या आवारात सुरु करण्यात आली होती. भारतीय जनता पक्षाकडून नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्यासाठी सरकार दबाव यावा म्हणून सही मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय जनता पक्षाच्या उपस्थित असणाऱ्या सर्व आमदारांनी सह्यांच्या मोहिमेत भाग घेतला. एवढंच नाही तर नरहरी झिरवळ जे राष्ट्रवादीचे नेते आहेत त्यांनी देखील सही केल्याने काहीसा आश्चर्य सगळ्यांना वाटले.
Read also:
- विधानसभा अध्यक्षीय निवडणूक 9 मार्चला प्रस्तापित; त्या 12 आमदारांचा देखील प्रश्न सुटणार
- ओबीसी आरक्षणावर अजित पवारांनी सांगितला फॉर्मुला; सोमवारी बिल देखील मांडणार
- 10 मार्चपर्यंत कामावर या, अन्यथा…; परिवहनमंत्री परबांचा एसटी कर्मचाऱ्यांना इशारा
- एसटीचं विलिनीकरण नाहीचं; वेतनात मात्र घसघशीत वाढ होणार
- आम्ही कुणाच्या दबावाला भीक घालत नाही; अजित पवारांचं प्रवीण दरेकरांना प्रत्युत्तर