मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेले ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षाणांवर आजही विधानसभेत चर्चा झाली. गेल्या दोन दिवसांपासून यासंदर्भात राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहे. ओबीसी आरक्षणासंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपण राज्य सरकारच्या बाजूने असल्याची भूमिका बोलून दाखविली. तर मंत्री छगन भुजबळ यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केलं.
राज्यपाल भाजपचे कार्यकर्ते म्हणून काम करताहेत; काँग्रेसची राज्यापालांवर जहरी टीका
देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, तुमच्या सारखा समजुतदार नेता असताना आरक्षण मिळण्यात काय अडचण येणार? आपल्या मध्ये दुरी निर्माण करण्यापेक्षा आपण सर्व एकत्र येऊन हा विषय सोडवू. कोण कुठं काय बोललं हे सर्व माझ्याकडे आहे. परंतु मला असं वाटतंय की आपण शांत बसून यावर योग्य मार्ग काढुया. केवळ दुरावा निर्माण करण्याचा तुमचा वाचवा हा शब्द आहे. तो बुडवा हा शब्द होईल असं करू नका, असाही चिमटा छगन भुजबळ यांनी काढला.
अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढणार; सीबीआयकडून सलग जबाब नोंद
देवेंद्र फडणवीस यांनी काल सर्वोच्च न्यायालयात आरक्षणासंदर्भात जो निर्णय दिला. त्यावर तुम्ही मत व्यक्त केले. ओबीसींच्या बाजूने तुम्ही आहात, ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळेच काल भाजपच्या एका भगिनींन ओबीसी वाचवा टोपी घालून दिली ती मी लगेचच घातली. असं भुजबळ म्हणाले.
पाणी पुरवठा टँकर घोटाळा: अण्णा हजारेंच्या स्वीय सहाय्यकाची कंपनी गोत्यात, अण्णांच्या भूमिकेकडे लक्ष
आपण आरक्षणाच्याबाबतीत भुजबळ यांना विचारा. आमची सहकार्याची भूमिका आहे. परंतु राज्य सरकार गंभीर आहे का? की कुणाच्या दबावाखाली आहे? आपण टोपी घातली पण हे आपल्याला टोपी घालत आहेत, हे लक्षात ठेवा. तुमचे आमचे राजकीय मतभेद असतील, पण आरक्षणाच्या बाबतीत आम्ही तुमच्या सोबत आहोत. असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं.
Read also:
- आमचे राजकीय मतभेद असतील परंतु…; देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे सरकारला सल्ला
- मग आता हे सरकार पवार साहेबांचे म्हणणे ऐकत नाही का? चंद्रशेखर बावनकुळे यांचा सवाल
- जेव्हा माय माऊलीची बेअब्रू अन्…; राज ठाकरेंच्या आवाजातल्या चित्रपटाच्या टीझरने घातला धुमाकूळ
- तुमचे जुने व्हिडिओ बाहेर काढले तर…; देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांना इशारा
- गिरीश महाजनांनी दाऊदच्या नातेवाईकांसोबत जेवण केले; नाथाभाऊंचा मोठा गौप्यस्फोट