अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या माजी स्वीय सहाय्यक आणि सध्याचे कार्यकर्ते उद्योजक सुरेश पठारे यांच्या कंपनीचा भ्रष्टाचार उघडकीस आला आहे. पारनेर तालुक्यातील लोकजागृती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रामदास घावटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली आहे. आता त्यांनी थेट अण्णा हजारे यांची भेट घेतली आहे.
एसटी विलिनीकरण नाहीच; त्रिसदस्यीय समितीने दिलेल्या अहवालावर राज्य मंत्रिमंडळाचा शिक्कामोर्तब
सुरेश पठारे यांची साई सहारा इन्फ्राण्ड फसिलिटी प्रा. लि. या कंपनीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टँकरने पाणी पुरवठा करताना यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे. यासंदर्भात रामदास घावटे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
नवाब मलिकांना मोठा दणका; न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला, ७ मार्चपर्यंत कोठडीच
2019 साली अहमदनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळामुळे पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली होती. या गावांना प्रशासनाकडून टँकरने पाणी पुरवठा केला. परंतु या दरम्यान त्यांनी पाणी पुरवठा करणाऱ्या टँकरच्या खेपा बोगस दाखवून मोठा गैरव्यवहार झाल्याचे आरोप केले आहेत. त्यामुळे या कंपनीशी संबंधित काही संचालक राळेगणसिद्धी येथील विविध संस्थांचे पदाधिकारी आहेत, त्यांचे राजीनामे घ्यावेत, अशी मागणी घावटे यांनी केली आहे. यावर आता हजारे काय भूमिका घेणार? याकडे लक्ष लागले आहे.
Read also:
- अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढणार; सीबीआयकडून सलग जबाब नोंद
- राज्यपाल भाजपचे कार्यकर्ते म्हणून काम करताहेत; काँग्रेसची राज्यापालांवर जहरी टीका
- न्यायालयासमोर आणखी किती वेळा तोंडघशी पडणार; ओबीसी आरक्षणावरून सरकारला चंद्रकांत पाटलांचा सवाल
- महाविकास आघाडी हे सरकार आहे की पोरखेळ? ओबीसी आरक्षणावरून देवेंद्र फडणवीसांची टीका
- काही बोलघेवडे मंत्री फक्त बोलत राहिले, त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा – चंद्रशेखर बावनकुळे