मुंबई : सध्या ओबीसी आरक्षणावरून राज्यात जोरदार आरोप- प्रत्यारोप होत आहेत. यासंदर्भात सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील चर्चा सुरु आहे. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकारने सादर केलेला अहवाल रद्द ठरवल्याने राज्य सरकारवर जोरदार टीका होत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सरकारवर ताशेरे ओढले आहे.
पाणी पुरवठा टँकर घोटाळा: अण्णा हजारेंच्या स्वीय सहाय्यकाची कंपनी गोत्यात, अण्णांच्या भूमिकेकडे लक्ष
सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारने मांडलेली बाज पाहता आरक्षणाला राज्य सरकारचा धक्का नाही धोका आहे, असं वाटायला लागलं आहे. कारण ओबीसी समाजाला आरक्षण देण्याची मानसिकता असती तर ओबीसींचा असा ओबडधोबड अहवाल दिला गेला नसता. जर काळजी असती तर अत्यंत गंभीरपणे राज्य सरकारने अहवाल सादर केला असता. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने देखील चांगला निर्णय दिला असता. त्यामुळे ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा बळी घेण्याचं काम झालेलं आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
गिरीश महाजनांनी दाऊदच्या नातेवाईकांसोबत जेवण केले; नाथाभाऊंचा मोठा गौप्यस्फोट
पंकजा मुंडे पुढे बोलताना म्हणाल्या की, आम्ही नेहमीच राज्य सरकारला सहकार्याची भूमिका ठेवली आहे. ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत राजकारण करायचं नाही, सगळ्यांनी मिळून राजकीय भूमिका बाजूला ठेवून ओबीसींसाठी भूमिका मांडायची असं ठरवलेलं आहे. त्यामुळे मी आज जी भूमिका तुमच्या समोर मांडतेय ती राजकीय नाही. ती समस्त ओबीसींच्या राजकीय भविष्यासाठी चिंता करणाऱ्या कार्यकर्त्यांची भूमिका आहे.
ओबीसी च्या राजकीय आरक्षणाला 'धक्का' नसून 'धोका' मिळाला आहे…राज्यातील ओबीसी चे राजकीय व्यासपीठ,संधी आणि भविष्य संपवण्याचा अधिकार कोणाला नाही..ओबीसी राजकीय आरक्षण नाही तर निवडणूक नाही..
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) March 3, 2022
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही ओबीसी आरक्षणाचा मुद्दा गाजला. यावेळी अनेक राजकीय नेत्यांनी यासंदर्भात आपापली भूमिका मांडली. ओबीसी आरक्षणासाठी विरोधी पक्ष देखील सरकार सोबत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
Read also:
- तुमच्या सारखा समजुतदार नेता…; भुजबळांनी विधानसभेत फडणवीसांचं केलं कौतुक
- आमचे राजकीय मतभेद असतील परंतु…; देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे सरकारला सल्ला
- मग आता हे सरकार पवार साहेबांचे म्हणणे ऐकत नाही का? चंद्रशेखर बावनकुळे यांचा सवाल
- जेव्हा माय माऊलीची बेअब्रू अन्…; राज ठाकरेंच्या आवाजातल्या चित्रपटाच्या टीझरने घातला धुमाकूळ
- तुमचे जुने व्हिडिओ बाहेर काढले तर…; देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांना इशारा