मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारला सवाल केला. ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकारवर कुणाचा दबाव आहे का? असं त्यांनी म्हटलं होतं. त्यावर आता राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रवीण दरेकर यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
पाणी पुरवठा टँकर घोटाळा: अण्णा हजारेंच्या स्वीय सहाय्यकाची कंपनी गोत्यात, अण्णांच्या भूमिकेकडे लक्ष
सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर 27 महिन्यानंतरही राज्य सरकार माहिती गोळा करू शकला नाही. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्द केले आहे. सरकारने आयोगाच्या कर्मचाऱ्यांचे पैसे देण्यात गांभीर्य दाखवले नाही. कोणतीही कृती न करता सरकारने केंद्र सरकारसोबत वाद घालण्यात वर्षे घालवली आहेत. त्यामुळे आरक्षणासाठी राज्य सरकारवर कुणाचा दबाव आहे का? असा सवाल प्रवीण दरेकर यांनी केला.
गिरीश महाजनांनी दाऊदच्या नातेवाईकांसोबत जेवण केले; नाथाभाऊंचा मोठा गौप्यस्फोट
प्रवीण दरेकर यांच्या सवालाला प्रत्युत्तर देताना अजित पवार म्हणाले की, आमच्यावर कुणाचा दबाव नाही आणि आम्ही कुणाच्या दबावाला भीक घालत नाही. त्यामुळे मी स्पष्टपणे सांगतोय राज्य सरकारने ही बाब गांभीर्याने घेतलेली आहे. आज संध्याकाळी मंत्रीमंडळाच्या बैठकीत तो विषय घेऊन त्याला मान्यता देण्यात येईल. सोमवारी विधेयक सर्वांनी मंजूर करुया.
तुमचे जुने व्हिडिओ बाहेर काढले तर…; देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांना इशारा
आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेणार नसल्याचे राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. या निर्णयाला विरोधी पक्षांनी देखील पाठिंबा दिला आहे.
Read also:
- ओबीसी आरक्षणाला राज्य सरकारचा धक्का नाही धोका; पंकजा मुंडे राज्य सरकारवर कडाडल्या
- तुमच्या सारखा समजुतदार नेता…; भुजबळांनी विधानसभेत फडणवीसांचं केलं कौतुक
- आमचे राजकीय मतभेद असतील परंतु…; देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे सरकारला सल्ला
- मग आता हे सरकार पवार साहेबांचे म्हणणे ऐकत नाही का? चंद्रशेखर बावनकुळे यांचा सवाल
- जेव्हा माय माऊलीची बेअब्रू अन्…; राज ठाकरेंच्या आवाजातल्या चित्रपटाच्या टीझरने घातला धुमाकूळ