ठाणे : भाजपच्या एका कार्यकर्त्यावर मागील दोन दिवसापूर्वी अज्ञात व्यक्तींकडून हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर त्याला तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रूग्णालयात जाऊन त्याची भेट घेतली. त्याच्यावर झालेला हल्ला हा राजकीय हेतुने झाला असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना कडक शब्दात इशारा दिला आहे.
आम्ही कुणाच्या दबावाला भीक घालत नाही; अजित पवारांचं प्रवीण दरेकरांना प्रत्युत्तर
भाजपचा समाज माध्यमं हाताळणारा डोंबिवलीतील भाजप कार्यकर्ता मनोज कटके यांच्यावर हल्ला झाला. दोन ते तीन दिवस उलटून गेले तरी अज्ञात गुन्हेगारांचा शोध लागला नाही. ज्यावेळी भाजपचे सरकार होते तेव्हा पोलीस दल कधीही दबावाखाली आले नव्हते. परंतु महाविकास आघाडी सरकार आल्यापासून पोलीस दल सतत दबावाखाली असल्याचे स्पष्ट दिसत आहे, असा घणाघाती आरोप देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर लावला.
एसटीचं विलिनीकरण नाहीचं; वेतनात मात्र घसघशीत वाढ होणार
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, भाजप कार्यकर्ता मनोज कटके यांच्यावर हल्ला होऊन चार दिवस उलटले आहेत. मात्र अद्यापही पोलिसांनी आरोपीला अटक केली नाही. ही शोकाची आणि गंभीर बाब आहे. आरोपीला लवकर अटक झाली नाही तर मी स्वतः डोंबिवलीत येऊन मोर्चा काढीन, आणि पोलीस ठाण्याला घेराव घालीन ,असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला. मनोज कटके यांच्यावर हल्ला झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस त्यांना भेटण्यासाठी रूग्णालयात गेले होते. तसेच या हल्ला संदर्भात विधानसभेत देखील हा मुद्दा मांडू असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
Read also:
- नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्याला राष्ट्रवादी करणार जोरदार विरोध; विराट मूक मोर्चाचे आयोजन
- नवाब मालिक राजीनामा द्या; विधानसभेच्या आवारात भाजपकडून स्वाक्षरी मोहीम
- विधानसभा अध्यक्षीय निवडणूक 9 मार्चला प्रस्तापित; त्या 12 आमदारांचा देखील प्रश्न सुटणार
- ओबीसी आरक्षणावर अजित पवारांनी सांगितला फॉर्मुला; सोमवारी बिल देखील मांडणार
- 10 मार्चपर्यंत कामावर या, अन्यथा…; परिवहनमंत्री परबांचा एसटी कर्मचाऱ्यांना इशारा