मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता पुण्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मागील काही काळापासून सातत्याने पाठपुरावा केल्याने आणि पुण्यातील मेट्रोचे काम नुकतेच पूर्णत्वास आल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे दौऱ्यास हिरवा कंदील दाखवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात मेट्रोच्या दोन टप्प्यांसह अन्य प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करणार आहेत. दुसरीकडे पुणे महानगरपालिकेतील प्रमुख विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मोदी यांच्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी आंदोलन करणार आहे.
ओबीसी आरक्षणाला राज्य सरकारचा धक्का नाही धोका; पंकजा मुंडे राज्य सरकारवर कडाडल्या
युक्रेन, रशिया सध्या सुरु आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून युद्धाचा संघर्ष सुरु आहे. युक्रेनमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय विद्यार्थी अडकलेले आहेत ज्यांना मायदेशी आणण्यात मोदी सरकार पूर्ण अपयशी ठरत आहे. असं असतानाही मोदी पुण्यात अर्धवट झालेल्या विकास कामांच्या उदघटनाला येत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात राष्ट्रवादी मूक आंदोलन करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली. यामध्ये विशेष बाब म्हणजे मोदींसोबत मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटनावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील व्यासपीठावर उपस्थित असणार आहेत.
आम्ही कुणाच्या दबावाला भीक घालत नाही; अजित पवारांचं प्रवीण दरेकरांना प्रत्युत्तर
प्रशांत जगताप यांनी म्हटलं आहे की, पंतप्रधान म्हणून त्यांचे पुण्यात स्वागत आहे. मात्र, पुणे भाजपकडून त्यांना गोंधळात टाकण्याचे काम करण्यात येत आहे. पंतप्रधान मोदी हे ३१ किलोमीटर मेट्रो मार्गाच्या उद्घाटनासाठी नाही तर अर्धवट असलेल्या ५ किलोमीटर मार्गाच्या उद्घाटनासाठी पुण्यात येत आहे असं देखील म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे महानगरपालिकेच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहेत, मात्र ही पुणेकरांची फसवणूक म्हटल्याने आम्ही मुक आंदोलनाने त्यांचे स्वागत करणार आहे, अशी टीका जगताप यांनी केली.
Read also:
- नवाब मालिक राजीनामा द्या; विधानसभेच्या आवारात भाजपकडून स्वाक्षरी मोहीम
- विधानसभा अध्यक्षीय निवडणूक 9 मार्चला प्रस्तापित; त्या 12 आमदारांचा देखील प्रश्न सुटणार
- ओबीसी आरक्षणावर अजित पवारांनी सांगितला फॉर्मुला; सोमवारी बिल देखील मांडणार
- 10 मार्चपर्यंत कामावर या, अन्यथा…; परिवहनमंत्री परबांचा एसटी कर्मचाऱ्यांना इशारा
- एसटीचं विलिनीकरण नाहीचं; वेतनात मात्र घसघशीत वाढ होणार