मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची याआधीच सचिन वाझे आणि अनिल देशमुख यांच्याप्रकरणी सीबीआय आणि एनआयएकडून चौकशी सुरु असताना, आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) देखील भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करणाऱ्या तीन स्वतंत्र तक्रारींवर त्यांची गोपनीय चौकशी सुरू केली आहे.
काही दिवसांपपूर्वी पोलिस निरीक्षक बी.आर. घाडगे यांनी पोलिस महासंचालक कार्यालयाला १४ पानी पत्र लिहून, परमबीरसिंग यांच्याविरोधात जातीय शिवीगाळ केल्याचा व भ्रष्टाचार करून कोट्यावधी रुपये कमवल्याचा आरोप केला होता. तसेच, या पत्राच्या प्रत्येकी एकेक प्रति त्यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक यांना देखील पाठवल्या होत्या.
तसेच, अनुप डांगेच्या तक्रारीतही परमबीर सिंग यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते, तर व्यावसायिक (बुकी) सोनू जलाननेही त्याच्या तक्रारीत, परमबीर सिंग यांच्याकडून जबरदस्तीने पैसे घेण्यात आल्यचा आरोप केला होता.
दरम्यान, आता चौकशी करताना तक्रारीतील आरोपांत एसीबीला तथ्य आढळून आल्यास परमबीर सिंग यांची खुली चौकशी सुरू केली जाऊ शकते अथवा त्यांच्याविरोधात बेहिशोबी मालमत्तेची साठवणूक केल्याबद्दल गुन्हा नोंदवून तपास केला जाऊ शकतो.
Read Also :
- “परदेशातून काय आलं हे मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांनाच विचारा”, जयंत पाटलांच्या टीकेला दरेकरांचे प्रत्युत्तर
- काँग्रेसने केले मान्य, नरेंद्र मोदींनी देशाला दिल्या “या” तीन गोष्टी
- सुप्रीम कोर्ट सगळे आदेश देत असेल, तर मोदी सरकार काय करतंय?; बाळासाहेब थोरातांचा परखड सवाल
- …. म्हणून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री घेणार राज्यपाल कोश्यारींची भेट
- आरोग्य अधिकाऱ्याला शिवीगाळ, काँग्रेस आमदाराविरोधात गुन्हा दाखल