मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या मार्गातल्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच चालल्याचे चित्र आता दिसू लागले आहे. याआधीच त्यांची सचिन वाझे आणि अनिल देशमुख यांच्याप्रकरणी सीबीआय आणि एनआयएकडून चौकशी सुरु असताना, आता यात अजून एका संस्थेची भर पडली असून, आता अँटी करप्शन ब्युरो (एसीबी) देखील त्यांची चौकशी करणार आहे.
काही दिवसांपपूर्वी पोलिस निरीक्षक बी.आर. घाडगे यांनी पोलिस महासंचालक कार्यालयाला १४ पानी पत्र लिहून, परमबीरसिंग यांच्याविरोधात जातीय शिवीगाळ केल्याचा व भ्रष्टाचार करून कोट्यावधी रुपये कमवल्याचा आरोप केला होता. तसेच, या पत्राच्या प्रत्येकी एकेक प्रति त्यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक यांना देखील पाठवल्या होत्या.
तसेच, अनुप डांगेच्या तक्रारीतही परमबीर सिंग यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते, तर व्यावसायिक (बुकी) सोनू जलाननेही त्याच्या तक्रारीत, परमबीर सिंग यांच्याकडून जबरदस्तीने पैसे घेण्यात आल्यचा आरोप केला होता. दरम्यान, आता या तिन्ही प्रकरणी एसीबी परमबीर सिंग चौकशी करत असून, आता त्यांची अधिक सखोल आणि गोपनीय चौकशी करण्यात येणार आहे.
Read Also :
- आदित्यला मंत्रिपद दिलं त्याच तत्परतेने बहुजनांच्या नियुक्त्यांचा प्रश्न मार्गी लावावा, पडळकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
- आरोग्यमंत्र्यांवर होतोय “हा” आरोप, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे चौकशीचे आदेश
- “सांगा योग्य कोण? पंतप्रधान की तुम्ही?”, फडणवीसांना जयंत पाटलांचा थेट सवाल
- राज्यातल्या “या” महत्वाच्या प्रश्नांवरून विशेष अधिवेशन बोलवा, दरेकरांची मागणी
- मराठा आरक्षणासाठी पाऊल पडणार पुढे? आघाडी सरकार “हा” मोठा निर्णय घेण्याची शक्यता