मुंबई : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन किर्तीकर यांची काल पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर लगेचच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काल बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेचे 13 खासदार झाले आहेत. त्यावरून भाजपने राषट्रवादीला डिवचलं आहे.
“आव्हाडांना अटक करून मोगली सरकारने निर्लज्जपणाचा कळस गाठला”
राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे राहिलेले आमदार, खासदार शिंदे गटात जावू नये म्हणून राष्ट्रवादीच्या नेत्यांचा खटाटोप सुरू आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेस नेहमी सत्तेत राहिली आहे. त्यामुळे त्यांचे नेते सत्तेशिवाय राहू शकत नाही. काही दिवस गेले की, राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये मोठी फाटाफुट होणार आहे. त्यांचे अनेक खासदार-आमदार, नेते भाजप आणि शिंदे गटात दाखल होतील. असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला आहे.
“आव्हाड साहेबांची कोणतीही चुक नाही, त्यांनीच मला बाहेर काढलं”; मारहाण केलेल्या तरूणाचं स्पष्टीकरण
आतापर्यंत 5 वेळा आमदार आणि 2 वेळा खासदार असलेले शिवसेनेचे नेते गजानन किर्तीकर यांनी देखील शिंदे गटात प्रवेश केल्याने ठाकरेंना याचा मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे आता शिंदे गटात 40 आमदार आणि 13 खासदार झाले आहेत. त्यातच शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केला आहे.
“आम्हा सर्वांना जेलमध्ये जावे लागले तरी चालेल पण..;”सुप्रिया सुळेंचा सरकारला इशारा
दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात जोरदार राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना एकत्रित निवडणुका लढण्याच्या तयारीत आहे. तर त्यांना मनसेचे इंजिन देखील जोडलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुसरीकडे महाविकास आघाडी युती करण्याचीही शक्यता आहे.
Read also
- किर्तीकरांनी पक्ष सोडला, राऊतांची प्रतिक्रिया म्हणाले, “उद्यापासून लोक त्यांनाही…”;
- “आमच्या पोरांना लग्नाआधी पोरं होतात”; राष्ट्रवादीच्या माजी आमदारांचं वादग्रस्त वक्तव्य
- मग आता प्रश्न विचारल्यावर मिरच्या का झोंबतायत ? काॅंग्रेसचा तिखट सवाल
- “राष्ट्रवादीची साथ सोडा सांगून कंटाळलो, अन् निर्णय घेतला”; किर्तीकरांचा शिंदे गटात प्रवेश
- “फडणवीस काल म्हणाले की, द्वेषाचं राजकारण थांबलं पाहिजे, अन् आज आव्हाडांना अटक”