पंढरपुर: पंढरपुरात नुकतीच विधानसभेची निवडणूक पार पडली. भगीरथ भालके आणि समाधान अवताडे यांच्यात काटे कि टक्कर पाहायला मिळाली. अखेरीस भारतीय जनता पक्षाचे समाधान अवताडे यांचा निवडणुकीत विजय झाला. विधानपरिषद आमदार प्रशांत परिचारक, आमदार विजयसिंह मोहिते पाटील पंढरपूरच्या निवडणुकीत किंगमेकर च्या भूमिकेत सर्वांच्या पुढे आले. पंढरपूर विधानसभा निवडणुकीनंतर सोलापूर जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची स्थिती आणखी मजबूत करण्यासाठी मोहिते, परिचारक, अवताडे हे तिन्ही आता मैदानात उतरल्याचे चित्र समोर आले आहे.
हे पण वाचा विजयानंतर आवताडे पंढरपुरात ऍक्शन मोडमध्ये
आमदार प्रशांत परिचारक, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार समाधान अवताडे हे आता हातात हात घालून समोर आल्याने राष्ट्रवादी काँग्रेला आता धडकी भरण्यासारखे वातावरण नक्कीच निर्माण झाले आहे. मोहिते पाटील आणि परिचारक मालक एकत्र आण्यासाठी आणि त्यांची राजकीय मैत्री घट्ट आणि मजबूत होण्यासाठी पंढरपूर येथील मोहिते पाटील समर्थक अमोल नागटिळक यांनी या तिन्ही भारतीय जनता पक्षाच्या आमदारांना आज एकत्रित आणून त्यांचा एकाच तुळशीच्या हातात सत्कार करत हम साथ साथ हे चा संदेशच जणू दिला आहे.
हे पण वाचा
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक आढावा: कशी जुळून आली नवीन सत्तेची समीकरणे?
शिवराज्यभिषेक दिनाचे औचित्य साधून प्रथमच अमोल नागटिळक यांनी तिन्ही आमदारांचा एकत्रित सत्कार करून स्नेहभोजनाचा कार्यक्रम देखील ठेवला आहे. यापुढील काळात सोलापुरात तिघा आमदारांनी एकत्रित येऊन जिल्ह्याचा विकासाला चालना द्यावी अशी अपेक्षा सत्कार प्रसंगी उपस्थितांनी व्यक्त केली आहे. साखर कारखानदारीसमोरील भविष्यातील अडचणी आणि त्यावरील कारखानदारांनी करावयाच्या उपाय योजनांसंबंधीही चर्चा यावेळी या तिघांमध्ये करण्यात आलेली आहे. मागील काळात मोहिते आणि परिचारक वेगवेगळे लढल्याने त्यांच्या हातून सत्ता गेली होती. आता एकत्रित आल्याने जिल्हापरिषद आणि विधानसभा निवडणुकीत एकत्रित लढल्याने पक्षाला आणि दोघांनाही विशेष फायदा झाला आहे.
हे पण वाचा
“दंड थोपटायचे असतील तर २०२४ च्या रिंगणात उतरा” पराभव मान्य करत, भगीरथ भालकेंचे परिचारिकांना आव्हान
उजनीच्या पाणीप्रश्नी सोलापूर जिंकले; इंदापूर हरले