मुंबई : शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल काही क्षणावर येऊन ठेपला आहे. त्याआधी ठाकरे आणि शिंदे गटात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. निकाल आधीच ठरला असून राहुल नार्वेकर यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणी आता ठाकरे गटाकडून घेण्यात आली आहे. तर त्याला शिंदे गटाकडूनही प्रत्युत्तर दिलं जात आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलेलं दिसून येत आहे.
हेही वाचा…“तर एकनाथ शिंदे अपात्र ठरणार,” राजकीय हालचालींना वेग
आम्ही आणखी ताकदीने जिल्ह्यातून आणि राज्यातून जास्तीत जास्त आमदार निवडून आणत उद्धवसाहेबांचे हात मजबूत करू. निकाल देणारे न्यायाधीस राहुल नार्वेकर मुख्यमंत्र्यांना भेटतात. यातच सारं आलंय. निकाल आधीच ठरलेला आहे. त्यामुळे राहुल नार्वेकर यांची नार्को टेस्ट केली तर यातील सर्व सत्य बाहेर येईल. जे गद्दार आहेत. त्यांना आजच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर रात्री झोप आली नसेल. असा हल्लाबोल ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी सांगितले आहे.
हेही वाचा…अजितदादांनी आखली मोठी रणनिती, अमोल कोल्हेंच्या विरोधात पार्थ पवार रिंगणात, आढळराव पाटलांचं काय होणार ?
दरम्यान, आमचा देव असलेल्या बाळासाहेबांचा आशिर्वाद आमच्या पाठीशी असल्याचेही देशमुखांनी सांगितले तर त्यावर आता संजय गायकवाड यांनी पलटवार केला आहे. ठाकरे गटाला कळून चुकलं आहे की आपला निकाल लागला आहे. त्यामुळे हे असे अकलेचे तारे तोडत असल्याची टिका संजय गायकवाड यांनी केलीय.
READ ALSO :
हेही वाचा…“खासदार हेमंत पाटलांचं बळ वाढलं,” मुख्यमंत्र्यांची आज हिंगोलीत जाहीर सभा
हेही वाचा…राहुल नार्वेकर कोणत्या गटाच्या आमदारांचा गेम करणार? वाचा संपुर्ण यादी
हेही वाचा…शिवसेना अपात्र आमदार प्रकरणावर वकिल उज्ज्वल निकम यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले..
हेही वाचा…मुंबईत ‘हा’ बडा नेता अजित पवार गटात प्रवेश करणार, पक्षाला बसला मोठा हादरा
हेही वाचा…राहुल नार्वेकरांच्या निकालाआधीच एकनाथ शिंदेंनी जाहीर केला निकाल, म्हणाले…