मुंबई : मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आंदोलनाच्या पाठीमागे शरद पवार आणि आमदार राजेश टोपे यांचा हात असल्याचा आरोप आज सत्ताधारी आमदारांनी सभागृहात केला. यानंतर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आंदोलनाच्या एसआयटी मार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली. त्यानुसार गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत एसआयटी मार्फत चौकशी होईल असे सभागृहात जाहीर केले. परंतु भाजपच्या आमदारांनी लावलेले सगळे आरोप राजेश टोपे यांनी फेटाळून लावले आहे.
हेही वाचा…जागावाटपाचा मुद्दा महायुतीत ठरणार कळीचा , शिंदे गट १८ जागांवर आग्रही तरअजितदादांकडून अधिकच्या जागांची मागणी
राजेश टोपे यांच्या कारखान्यातून आंदोलनाच्या वेळी दगड पुरवण्यात आले. त्याठिकाणी त्यांच्या बैठकाही झाल्यात. तसेच जरांगे पाटलांच्या सर्व सभांचा, जेसीबी, ट्रॅक्टर यांचा खर्च शरद पवारांनी केला असून शरद पवारांसह राजेश टोपे आणि रोहित पवार यांची देखील चौकशी व्हावी, अशी मागणी भाजपच्या आमदारांनी केली. त्यावर माझ्यावरील एक टक्के तरी आरोप सिद्ध झाले तर राजकारणातून सन्यांस घेऊन असं राजेश टोपे यांनी म्हटले आहे.
आमचा मनोज जरांगे पाटलांसोबत कोणताही संपर्क नाही. उलट सरकारचं जरांगे पाटलांसोबत चर्चा करत आहे. ज्यावेळी सरकारचं शिष्टमंडळ अंतरवाली सराटीत येत होता. त्यावेळी स्थानिक आमदार म्हणून जात होतो. त्यानंतर त्यांच्याशी माझा अन् माझ्या पक्षासोबत कोणताही संपर्क नाही. तसेच माझ्या कारखान्यावर अनेक लोकं येतात. एव्हाना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हेलिपॅड देखील तिथेच उतरला. पत्रकार तसेच इतरजणही त्याठिकाणी येत असतात. असे काहीही झालेलं नाही. जर माझ्याविरूद्ध एक टक्केही आरोप सिद्ध झालं तर राजकारणातून सन्यास घेऊन असे राजेश टोपे यांनी सांगितले आहे.
हेही वाचा…मोठी बातमी…! ठाकरे गटाचा आणखी एक ‘हा’ माजी नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत दाखल
दरम्यान, माझ्यावर केलेले दगडफेकीचे सर्व आरोप, संशय धांदात खोटे आहेत. बिनबुडाचे आरोप असून यामध्ये कुठेही सत्यता नाही. हा लढा उदात्त हेतूसाठी असून त्याला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केला जात आहे. राजेश टोपे यांना लोक चांगलेच ओळखतात. त्यामुळे तुम्ही कितीही चौकशी करा. असेही त्यांनी सांगितले.
READ ALSO :
हेही वाचा“फसव्या घोषणा अन् पोकळ आश्वासनांची रेलचेल, अर्थसंकल्प म्हणजे शिळ्या कडीला उत आणणारा “
हेही वाचाजनतेला वेड्यात काढण्याचा महायुतीचं कामं, आधी आंतरवाली सराटीच्या लाठीचार्जची SIT चौकशी करा, मग..
हेही वाचा…शिंदेंचा ‘हा’ माजी खासदार अजित पवार गटात करणार प्रवेश, कोल्हेंच्या विरोधात महायुतीची रणनिती ठरली ?
हेही वाचा…पुणेकरांना हवा ‘व्हिजनरी’ खासदार, कोण असेल नागरिकांच्या पसंतीचा उमेदवार ; हे मुद्दे लक्षात घ्या
हेही वाचाअटल सेतू, कोस्टर रोड, ते मिहान प्रकल्प, अजितदादांनी काय काय घोषणा केल्या ?