मुंबई : मराठा आंदोलनादरम्यान, अंतरवाली सराटीत दगड कुणी आणलेत ? मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला, सभांना पैसे कुणी पुरविले ? या सगळ्यांची राज्य सरकारकडून एसआयटी मार्फेत चौकशी केली जाणार असल्याची घोषणा आज गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. राज्याच्या विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात राज्य सरकारचं अर्थसंकल्प सादर करण्यात आलं. त्याआधी दोन्ही सभागृहात मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर एसआयटी चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली. यावरून विरोधकांनी आज राज्य सरकारवर जोरदार टिकास्त्र सोडलं आहे.
हेही वाचा…मराठा आरक्षणाबाबत आणखी आनंदाची बातमी..! राज्य सरकारने घेतला ‘हा’ निर्णय
एसआयटी चौकशीच्या नावाखाली केवळ जनतेची दिशाभूल करण्याचं काम महायुती सरकारने केलंय. आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण उपोषणस्थळी दगडफेक व लाठीचार्जच्या प्रकरणाचीही एसआयटी चौकशीची मागणी करण्यात आली होती, तेव्हा फडणवीसांनी पुढाकार घेतला नाही. आता मात्र स्वतःच्या चुकीचं खापर विरोधकांवर फोडून आंदोलनकर्त्यांचा आवाज दाबण्यासाठी एसआयटीचा पुढाकार घेतला जातोय. असा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने केली आहे.
हेही वाचा…“विरोधकांनी आयमाय काढली तरीही हा फडणवीस तुमच्या बाजूने उभा राहिल”, फडणवीसांनी दिली ग्वाही
मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागे शरद पवारांचा हात असल्याचा आरोप यावेळी भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी सभागृहात केला. जरांगेंच्या सभांना जेसीबी, ट्रॅक्टर हे शरद पवारांनी पुरावल्याचाही आरोप त्यांनी केला. त्यानंतर या संपुर्ण प्रकरणाची आता एसआयटी मार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी भाजपच्या आमदारांनी केली आहे. त्यामुळे मराठा आंदोलनाला आता वेगळचं वळण लागलं आहे.
म्हणायचं शोधून काढू बोलवात धनी. नुसतंच काळंबरं यांच्या मनी. असं म्हणत दुध का दुध का पाणी करण्याच्या विचारात असणाऱ्या महायुती सरकारनं आंतरवाली सराटी येथे लाठीचार्ज केला होता. त्याच्याच एसआयटी चौकशीचा अद्याप पत्ता नाही. आणि आणखी पुन्हा एसआयटी चौकशी करतंय. जनतेला वेड्यात काढण्याचा महायुतीचं काम अशी टिका देखील त्यांनी केली.
एसआयटी चौकशीच्या नावाखाली केवळ जनतेची दिशाभूल करण्याचं काम महायुती सरकारने केलंय. आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण उपोषणस्थळी दगडफेक व लाठीचार्जच्या प्रकरणाचीही एसआयटी चौकशीची मागणी करण्यात आली होती, तेव्हा फडणवीसांनी पुढाकार घेतला नाही. आता मात्र स्वतःच्या चुकीचं खापर विरोधकांवर… pic.twitter.com/e4FbfQUBjS
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) February 27, 2024
READ ALSO :
हेही वाचा…शिंदेंचा ‘हा’ माजी खासदार अजित पवार गटात करणार प्रवेश, कोल्हेंच्या विरोधात महायुतीची रणनिती ठरली ?
हेही वाचा…पुणेकरांना हवा ‘व्हिजनरी’ खासदार, कोण असेल नागरिकांच्या पसंतीचा उमेदवार ; हे मुद्दे लक्षात घ्या
हेही वाचाअटल सेतू, कोस्टर रोड, ते मिहान प्रकल्प, अजितदादांनी काय काय घोषणा केल्या ?
हेही वाचा…जागावाटपाचा मुद्दा महायुतीत ठरणार कळीचा , शिंदे गट १८ जागांवर आग्रही तरअजितदादांकडून अधिकच्या जागांची मागणी
हेही वाचा…मोठी बातमी…! ठाकरे गटाचा आणखी एक ‘हा’ माजी नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत दाखल