मुंबई : मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात राज्याच्या विधिमंडळात सत्ताधारी पक्षाचे आमदार चांगलेच आक्रमक झाले. मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे कोणाचा हात आहे. ? त्यांना आंदोलनाला कुठून पैसे मिळाले ? असा सवाल करत दोन्ही सभागृहात मराठा आंदोलनाची एसआयटी चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आले. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राज्य सरकारला या प्रकरणाबाबत एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे राज्य सरकारला आदेश दिले. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी चौकशी करण्यात येईल, असे सांगितले आहे.
हेही वाचा…“राष्ट्रवादीच्या प्रचाराची तुतारी फडणवीसांनी फुंकली,” राऊतांनी ‘तो’ व्हिडीओ शेअर करून फडणवीसांना डिवचलं
याबाबत देवेंद्र फडणवीस सभागृहात म्हणाले की, SIT गठीत करण्याबाबत विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्देशांचे पालन केले जाईल. मला या विषयावर बोलायचे नव्हते, पण बोलावे लागते आहे. मराठा आरक्षण माझ्याच कार्यकाळात दिले गेले. ते हायकोर्टात टिकविले आणि मी मुख्यमंत्री असेपर्यंत सुप्रीम कोर्टात सुद्धा टिकविले. या संपूर्ण काळात सारथी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आदी अनेक उपाय केले आणि त्याचा लाभ मोठ्या प्रमाणात मराठा समाजाला झाला आणि आजही होतो आहे. त्यामुळेच संपूर्ण मराठा समाज माझ्या मागे उभा राहिला आणि आहे.
हेही वाचा…“गोर गरिबांचा कैवारी, टायगर इज बॅक ” गणपत गोळीबार प्रकरणातील महेश गायकवाडांना रूग्णालयातून डिस्चार्ज
पुढे बोलतांना फडणवीस म्हणाले की, पण मला आई-बहिणीच्या शिव्या द्यायच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे, हा काय प्रकार? कुणाकडे बैठक झाली, कुणी दगडफेक करायला सांगितली, ते आता आरोपी सांगत आहेत! या संपूर्ण प्रकारात बीडच्या घटना कशा विसरता येतील? तुम्ही राजकारण कुठल्या स्तराला घेऊन निघाले आहात? कुणाचे कार्यकर्ते आहेत? कोण पैसा देते आहे? हे सारे समोर येते आहे आणि येईलच. असा इशारा फडणवीसांनी दिला.
दरम्यान, मला जरांगे यांच्यावर काहीच बोलायचे नाही. पण त्यांचा बोलविता धनी कोण? हे शोधून काढले जाईल. छत्रपती संभाजीनगर आणि नवी मुंबईत वॉररूम कुणी सुरू केल्या, हेही तपासात पुढे येते आहे. एक नक्की हे संपूर्ण षडयंत्र पुढे आणले जाईल. अशी शिवीगाळ कुणालाही झाली, मग ते विरोधक का असेना, तर त्याच्यासोबत उभा राहणारा हा देवेंद्र फडणवीस पहिला असेल . असेही ते म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा..“आंदोलनाची एसआयटी मार्फत चौकशी, फडणवीसांनी जरांगेंना ललकारलं,” जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…
हेही वाचा…“मराठा आरक्षण आंदोलनकर्त्यांचा बोलवता धनी कोण ?” SIT ची चौकशीची मागणी, सभागृहात एकच गोंधळ
हेही वाचा…“विदर्भामध्ये वसुली गॅंग बसलीय”, शिंदे गटात प्रवेश करताच ‘या’ महिला नेत्याने ठाकरेंवर चढवला हल्ला
हेही वाचा…मराठा आरक्षणावर शरद पवार अन् उद्धव ठाकरे गप्प का ? भाजप नेत्याचा सवाल
हेही वाचा…“पार्लमेंटमध्ये नवरा जाणार आहे की मी जाणार”, सुप्रिया सुळेंनी अजितदादांना डिवचलं