बारामती : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी बारामती मतदारसंघात कार्यक्रमांचा धडाका लावला आहे. अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांनी देखील बारामती लोकसभा मतदारसंघात कार्यक्रम घेण्यास सुरूवात केली आहे. यातच आता खासदार सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांच्यावर अप्रत्यक्ष टिका केली आहे.
हेही वाचा…“जरांगे पाटील अन् मुख्यमंत्र्यांमध्ये त्यावेळी काय चर्चा झाली, ‘ती’ समोर आणा,” विरोधकांची मोठी मागणी
एका कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. माझं घर नाही चालत माझ्या खासदारकीवर, कशाला चालायला हवं. मी माझ्या नवऱ्याला सांगितलं आहे. नवऱ्याचं काय काम इकडे? आमचे लग्न म्हणजे आती क्या खंडाला. काय इकडे तिकडे नाही जायचं. तुम्हाला असं पाहिजेल, जिथे माझा नवरा येऊन भाषण करेल, चालेल का ? पार्लमेंटमध्ये नवरा जाणार आहे की मी जाणार आहे. नवऱ्याने कॅन्टिनमध्ये बसायचं. माझा नवरा येत नाही. पण ज्या नवऱ्याला उत्साह आहे ना. त्याने यांचं पार्लमेंटमध्ये आणि बायको आत गेली की बसायचं कॅंटिनमध्ये पर्स घेऊन. अस सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.
हेही वाचा…ना विलास लांडे, ना आढळराव पाटील..! अजित पवारांच्या ‘या’ एकेकाळच्या कट्टर समर्थकावर महायुती लावणार डाव ?
तर दुसऱ्या कार्यक्रमात सुनेत्रा पवार यांनी जनेतला साद घातली आहे. अजितदादांवर तुमचा विश्वास आहे म्हणून तुम्ही याठिकाणी आले आहेत. त्यामुळे आपल्याला विकासाला महत्व दिलं पाहिजे. असं सुनेत्रा पवार यांनी म्हटलं आहे. यातच आता सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार अशी लढत अटळ मानली जात आहे.
READ ALSO :
हेही वाचा“राष्ट्रवादीच्या प्रचाराची तुतारी फडणवीसांनी फुंकली,” राऊतांनी ‘तो’ व्हिडीओ शेअर करून फडणवीसांना डिवचलं
हेही वाचा…“गोर गरिबांचा कैवारी, टायगर इज बॅक ” गणपत गोळीबार प्रकरणातील महेश गायकवाडांना रूग्णालयातून डिस्चार्ज
हेही वाचा…“बारामतीतून सुनेत्रा पवार दीड लाखांनी विजयी होतील,” भाजपच्या ‘या’ माजी खासदाराने वर्तवला अंदाज
हेही वाचा…“उपोषण मागे घेण्याची जरांगे पाटलांची मोठी घोषणा, फडणवीसांवर चढवला पुन्हा हल्ला,” म्हणाले…
हेही वाचा…दोन दिवसापुर्वी ठाकरे गटावर गंभीर आरोप, अन् आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, ‘या’ महिला नेत्याची जोरदार चर्चा