सातारा : केंद्रीय निवडणुक आयोगाकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला तुतारी हे निवडणुक देण्यात आलं. त्यानंतर शरद पवाराने रायगडावर जाऊन आपल्या निवडणुक चिन्हाचं अनावरण केलं. यानंतर भाजपने सडकून टिका केली. यातच सातारा येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं तुतारी वाजवून स्वागत करण्यात आलं. त्यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांवर जोरदार घणाघात चढवला.
हेही वाचा…ना विलास लांडे, ना आढळराव पाटील..! अजित पवारांच्या ‘या’ एकेकाळच्या कट्टर समर्थकावर महायुती लावणार डाव ?
सातारा जिल्ह्यातील भाजपचे नेते राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांचा नुकताच वाढदिवस साजरा करण्यात आला. दुसऱ्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा जिल्ह्यातील जलमंदिर पॅलेज या उदयनराजेंच्या घरी जाऊन त्यांचे अभीष्टचिंतन केले. याप्रसंगी फडणवीस यांचे तुताऱ्यांच्या निनादात स्वागत करण्यात आले. हा व्हिडीओ देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर शेअर केला. यावरून राऊतांनी टिका केली.
हेही वाचा….“करेक्ट कार्यक्रम तुमचा नाही तर तुमच्या पाठीमागे..”अजय महाराजांचे पुन्हा गौप्यस्फोट, जरांगेंवर हल्लाबोल
संजय राऊत म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस (खरी) च्या प्रचाराची तुतारी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सातारा येथे फुंकली. हा एक अपूर्व योगायोग!लवकरच ते अशा प्रकारे शिवसेनेची मशाल घेऊनही राज्यात फिरतील. ही तर श्रींची इच्छा! फडणवीस यांनी माहविकास आघाडीच्या विजयाची तुतारी फुंकल्या बद्दल त्यांचे आभार!
राष्ट्रवादी काँग्रेस(खरी) च्या प्रचाराची तुतारी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सातारा येथे फुंकली..हा एक अपूर्व योगायोग!लवकरच ते अशा प्रकारे शिवसेनेची मशाल घेऊनही राज्यात फिरतील.
ही तर श्रींची इच्छा!
फडणवीस यांनी माहविकास आघाडीच्या विजयाची तुतारी फुंकल्या बद्दल त्यांचे आभार!…— Sanjay Raut (@rautsanjay61) February 26, 2024
READ ALSO :
हेही वाचा…“गोर गरिबांचा कैवारी, टायगर इज बॅक ” गणपत गोळीबार प्रकरणातील महेश गायकवाडांना रूग्णालयातून डिस्चार्ज
हेही वाचा…“बारामतीतून सुनेत्रा पवार दीड लाखांनी विजयी होतील,” भाजपच्या ‘या’ माजी खासदाराने वर्तवला अंदाज
हेही वाचा…“उपोषण मागे घेण्याची जरांगे पाटलांची मोठी घोषणा, फडणवीसांवर चढवला पुन्हा हल्ला,” म्हणाले…
हेही वाचा…दोन दिवसापुर्वी ठाकरे गटावर गंभीर आरोप, अन् आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, ‘या’ महिला नेत्याची जोरदार चर्चा
हेही वाचा…“जरांगे पाटील अन् मुख्यमंत्र्यांमध्ये त्यावेळी काय चर्चा झाली, ‘ती’ समोर आणा,” विरोधकांची मोठी मागणी