मुंबई : जरांगे पाटलांनी काल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली. यावेळी जरांगे पाटलांच्या तोंडून काही शिव्या देखील निघाल्या. तर मुंबईच्या दिशेने निघणाऱ्या जरांगे पाटलांना माघारीची भूमिका घ्यावी लागली. यानंतर राज्यात सध्या वातावरण चांगलचं गढूळ झालं आहे. अशातच आता अजय महाराज यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगे पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यामुळे राज्यात आता पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा वाद पेटू लागला आहे.
हेही वाचा…“जरांगेंचे काळेधंदे बाहेर आले तर मराठा समाज दगडं मारतील”, अजय महाराज जरांगेंवर बरसले
काल पासून मनोज जरांगे पाटलांवर प्रचंड टिका करण्यास सुरूवात झाली आहे. प्रसाद लाड यांनी तुमच्यावर नटरंग म्हणून टिका केली. तुमच्यामुळे मराठा समाजाला खाली मान घालायची वेळ आली आहे. देवेंद्र फडणवीस यांचा आणि माझा काय संबंध आहे. ? काल माझा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एक फोटो ट्विट केला. त्यानंतर मी फडणवीसांचा माणुस असल्याची टिका केली. त्या फोटोत असलेल्या सगळ्या माणसाला विचारा की फडणवीसांसोबत का भेट घेतली होती ? आरक्षण मारुतीच्या मंदिरात बसून मिळत नाही. त्यामुळे त्यासाठी राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घ्याव्याच लागतात. असा पलटवार देखील त्यांनी केला.
हेही वाचा…जरांगे पाटलांनी मराठा समाजाला फसवलं, अजय महाराजांचा पुन्हा जोरदार घणाघात, पुराव्यासगट सगळचं दाखवलं
उपोषणाला बसलेल्या जरांगे पाटलांना दोन माणुस धरून आणत होते. परंतु काल अचानक काय झाले की पंधरा जणांना हा माणूस ऐकत नव्हता. माझ्या चरित्र्यावर शिंतोडे उडवणाऱ्या ती महिला कुठे आहे ? माझ्यावर कोट्यावधी रूपयाचे आरोप केलेत. ते पैसे कुठे आहेत ? माझ्यावर बलात्कारी म्हणून आरोप झालेत. परंतु त्यातील एकही गोष्ट सिद्ध करू शकले नाहीत. असं म्हणत जरांगे पाटलांनी अनेक गोष्टी कबुल केल्या आहेत. असा हल्लाबोल देखील अजय महाराज यांनी जरांगेंवर केला.
जरांगे पाटलांकडे काहीही पुरावा नाही. त्यांच्या तोंडून आता राजकीय भाषा निघू लागली आहे. करेक्ट कार्यक्रम तुमचा नाही तर तुमच्या पाठीमागे असलेल्या समाजाचा झाला आहे. सरकारची इच्छा शक्ती असल्यावर काय होऊ शकतं. हे सरकारने करून दाखवलं आहे. त्यामुळे तुम्ही चुकलात जरांगे पाटील. तुम्ही मला कितीही शिव्या दिल्या तरी आम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कायदेशीर लढाई लढणार. असेही त्यांनी सांगितले.
READ ALSO :
हेही वाचा…मनोज जरांगेंच्या बोलण्यातून राजकीय वास, मंत्र्यांचा गंभीर आरोप
हेही वाचा…जरांगेंच्या सहकाऱ्यांची पोलिसांकडून धरपकड, तीन जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
हेही वाचा…“एकनाथ खडसे यांनी भाजपात यावं असं मी आवाहन केलंच नाही,” रक्षा खडसेंचं घुमजाव
हेही वाचा…“राजकारणात मला कुणीही संधी दिली नाही ती अपघातानेच मिळाली”, अजित पवारांचा शरद पवारांना अप्रत्यक्ष टोला
हेही वाचा.जागा एक, इच्छूक तीन, शिरूर लोकसभेसाठी महायुतीत कुर्बानी देणार कोण ?