बारामती : आगामी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार मतदारसंघात चांगलीच मोर्चेबांधणी करतांना दिसत आहे. सुप्रिया सुळे यांच्यासह सुनेत्रा पवार यांनी देखील बारामती मतदारसंघात कार्यक्रमांचा धडका सुरू केला आहे. अशातच बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार किमान दोन लाख मतांनी निवडून येतील असा अंदाज भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा…मनोज जरांगेंच्या बोलण्यातून राजकीय वास, मंत्र्यांचा गंभीर आरोप
संजय काकडे म्हणाले की, मागील ५० वर्षांपासून बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार विजयी होण्यासाठी प्रयत्न करत आहोत. भाजप किंवा घटक पक्षाने एकदा तरी बारामती जिंकायची असा आम्ही प्रयत्न करत आहोत. आमच्याकडून २०१४ च्या निवडणुकीत दुर्लक्ष झाल्याने आमची जागा ५७ हजार मतांनी पडली. तर २०१९ च्या निवडणुकीत दीड लाख मतांनी आमची जागा गेली. मात्र आता भाजपसोबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आला असून त्यामध्ये पवार नावाची व्यक्ती आहे. त्यामुळे एक निश्चित ताकद वाढली असल्याचे संजय काकडे यांनी सांगितले.
हेही वाचा…जरांगेंच्या सहकाऱ्यांची पोलिसांकडून धरपकड, तीन जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
दरम्यान, सुनेत्रा पवार या बारामती लोकसभा मतदारसंघातून किमान दो लाख मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास देखील काकडे यांनी व्यक्त केला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या इंदापुर, दौंड, पुरंदर, खडकवासला आणि भोर या विधानसभा मतदारसंघात नेते, कार्यकर्ते सुप्रिया सुळे यांच्यासोबत राहिले नसल्याचाही दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांचं पारडं जड आहे. असेही ते म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…“उपोषण मागे घेण्याची जरांगे पाटलांची मोठी घोषणा, फडणवीसांवर चढवला पुन्हा हल्ला,” म्हणाले…
हेही वाचा…दोन दिवसापुर्वी ठाकरे गटावर गंभीर आरोप, अन् आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, ‘या’ महिला नेत्याची जोरदार चर्चा
हेही वाचा…“जरांगे पाटील अन् मुख्यमंत्र्यांमध्ये त्यावेळी काय चर्चा झाली, ‘ती’ समोर आणा,” विरोधकांची मोठी मागणी
हेही वाचा…ना विलास लांडे, ना आढळराव पाटील..! अजित पवारांच्या ‘या’ एकेकाळच्या कट्टर समर्थकावर महायुती लावणार डाव ?
हेही वाचा….“करेक्ट कार्यक्रम तुमचा नाही तर तुमच्या पाठीमागे..”अजय महाराजांचे पुन्हा गौप्यस्फोट, जरांगेंवर हल्लाबोल