मुंबई : दोन दिवसांपुर्वी ठाकरे गटातील महिला नेत्या विशाखा राऊत व रंजना नेवाळकर यांच्यावर आरोप करणाऱ्या पुर्व विदर्भ महिला संपर्क संघटक आणि प्रवक्त्या प्रा. शिल्पा बोडखे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. दोन दिवसापूर्वी त्यांनी ठाकरे गटावर गंभीर आरोप करत ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केलं होतं. त्यानंतर त्यांनी आज शिंदे गटात प्रवेश केला आहे.
हेही वाचा…“एकनाथ खडसे यांनी भाजपात यावं असं मी आवाहन केलंच नाही,” रक्षा खडसेंचं घुमजाव
माझी चार वर्षांची मेहनत आज व्यर्थ गेली असं म्हणत ठाकरे गटाच्या नेत्या शिल्पा बोडखे यांनी ठाकरे गटाचा राजीनामा दिला होता. यावेळी त्यांनी शिवसेना नेते उद्धव ठाकरे आणि युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या शब्दाला काही किमंत न देता विशाखा राऊत व रंजना नेवाळकर आपला मनमानी कारभार करत आहे. असा आरोप शिल्पा बोडखे यांनी केला होता. तसेच रंजना नेवाळकर यांच्या हाताचा मटनाचा वास गेला असेलच पुन्हा नागपुरात येऊन सावजीवर ताव मारा व महाप्रसादाचे वाटप करा. असेही बोडखे यांनी म्हटले होते.
हेही वाचा…“राजकारणात मला कुणीही संधी दिली नाही ती अपघातानेच मिळाली”, अजित पवारांचा शरद पवारांना अप्रत्यक्ष टोला
त्यानंतर आज शिल्पा बोडखे यांनी शिवसेना शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला. प्रा.शिल्पा बोडखे यांनी आज वर्षा या निवासस्थानी येऊन हाती भगवा घेत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी विदर्भात शिवसेना वाढवण्याचे सर्वसामान्य पोहचवण्याचे काम आजवर त्यांनी आपल्या पूर्ण क्षमतेने व प्रामाणिकपणे केले होते. यापुढे त्याच प्रामाणिकपणे पक्षाचे काम त्यांनी करावे आणि वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवावेत अशी अपेक्षा यावेळी एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती आणि शिवसेनेच्या महिला नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यादेखील उपस्थित होत्या.
उबाठा गटाच्या पूर्व विदर्भ महिला संपर्क संघटक आणि प्रवक्त्या प्रा.शिल्पा बोडखे यांनी आज वर्षा या निवासस्थानी येऊन हाती भगवा घेत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
विदर्भात #शिवसेना… pic.twitter.com/sSAdB0fgVH
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) February 26, 2024
माझा शिवसेना पक्षाला शेवटचा जय महाराष्ट्र…
माझी चार वर्षांची मेहनत आज व्यर्थ गेली आहे याचे दु:ख आहे, पक्षात पक्षप्रमुख व शिवसेना नेते @AUThackeray जी यांच्या शद्बाला काही किंमत न देता विशाखा राऊत व रंजना नेवाळकर आपला मनमानी कारभार करत आहे त्यामुळे मी पक्षाचा राजीनामा देत… pic.twitter.com/OZJUyFbKwa
— Shilpa Bodkhe – प्रा.शिल्पा बोडखे (@BodkheShilpa) February 22, 2024
READ ALSO :
हेही वाचा…“जरांगे पाटील अन् मुख्यमंत्र्यांमध्ये त्यावेळी काय चर्चा झाली, ‘ती’ समोर आणा,” विरोधकांची मोठी मागणी
हेही वाचा…ना विलास लांडे, ना आढळराव पाटील..! अजित पवारांच्या ‘या’ एकेकाळच्या कट्टर समर्थकावर महायुती लावणार डाव ?
हेही वाचा….“करेक्ट कार्यक्रम तुमचा नाही तर तुमच्या पाठीमागे..”अजय महाराजांचे पुन्हा गौप्यस्फोट, जरांगेंवर हल्लाबोल
हेही वाचा…मनोज जरांगेंच्या बोलण्यातून राजकीय वास, मंत्र्यांचा गंभीर आरोप
हेही वाचा…जरांगेंच्या सहकाऱ्यांची पोलिसांकडून धरपकड, तीन जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात