मुंबई : मनोज जरांगे पाटलांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप लावल्यानंतर राज्य सरकारने संपुर्ण जालना आणि तसेच बीड जिल्ह्यात संचारबंदीचे आदेश दिले. त्यानंतर जरांगे पाटलांनी आपलं आमरण उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थिती करण्यात आला. यावेळी भाजप नेते आशिष शेलार यांनी मनोज जरांगेसह या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी केली. तर दुसऱ्या बाजूला सरकारने जरांगेंसोबत वाशीत गुलाल उधळला, तर मग जरांगे पाटलांना पुन्हा उपोषण करण्याची वेळ का आली ? असा सवाल विरोधकांनी लावून धरली. यातच आता मराठा आरक्षण आंदोलनकर्त्यांचा बोलवता धनी कोण ? असा सवाल आता राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार यांच्याकडून करण्यात आला आहे.
हेही वाचा…“बारामतीतून सुनेत्रा पवार दीड लाखांनी विजयी होतील,” भाजपच्या ‘या’ माजी खासदाराने वर्तवला अंदाज
आंदोलनात दगड कुठून आलेत ? जरांगे पाटलांच्या आंदोलनात जेसीबी, ट्रॅक्टर कुणाच्या कारखान्यातून आलेत. तसेच मराठा आरक्षणाला मदत करणारा तो कोणत्या पक्षाचा व्यक्ती आहे. असा सवाल करत आशिष शेलार यांनी या संपुर्ण प्रकराणाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर सभागृहात एकच गोंधळ निर्माण झाला. तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृह पाच मिनिटं तहकुब करण्याचा निर्णय घेतला. तर दुसऱ्या सभागृहात देखील भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी एसआयटीच्या चौकशीची मागणी लावून धरली.
हेही वाचा…“उपोषण मागे घेण्याची जरांगे पाटलांची मोठी घोषणा, फडणवीसांवर चढवला पुन्हा हल्ला,” म्हणाले…
दरम्यान, मराठा आरक्षण आंदोलनकर्त्यांचा बोलवता धनी कोण ? असा प्रश्न सातत्याने राज्यातील भाजपचे नेते विचारत आहेत. परंतु याच नेत्यांकडून ही मागणी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे का केली जात नाही. हिंमत असेल तर भाजप नेत्यांच्या मागणीला ग्राह्य धरून सक्षम असे गृहमंत्री व उपमुख्यमंत्री फडणवीसांनी पुढाकार घेऊन या बोलवत्या धन्यांना हुडकून काढावं. अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार यांच्या मार्फत करण्यात आली.
READ ALSO :
हेही वाचा…“विदर्भामध्ये वसुली गॅंग बसलीय”, शिंदे गटात प्रवेश करताच ‘या’ महिला नेत्याने ठाकरेंवर चढवला हल्ला
हेही वाचा…मराठा आरक्षणावर शरद पवार अन् उद्धव ठाकरे गप्प का ? भाजप नेत्याचा सवाल
हेही वाचा…“पार्लमेंटमध्ये नवरा जाणार आहे की मी जाणार”, सुप्रिया सुळेंनी अजितदादांना डिवचलं
हेही वाचा“राष्ट्रवादीच्या प्रचाराची तुतारी फडणवीसांनी फुंकली,” राऊतांनी ‘तो’ व्हिडीओ शेअर करून फडणवीसांना डिवचलं
हेही वाचा…“गोर गरिबांचा कैवारी, टायगर इज बॅक ” गणपत गोळीबार प्रकरणातील महेश गायकवाडांना रूग्णालयातून डिस्चार्ज