मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचं अंतरिम अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधिमंडळात सादर केलाय. यावेळी यंदाचा अर्थसंकल्प अंतरिम असल्यामुळे त्यात पुढील चार महिन्यांच्या खर्चाचीच तरतुद करण्यात आल्याचे अजित पवारांनी सुरूवातीलाच स्पष्ट केले. तर यावर्षी महाराष्ट्राला वस्तू व सेवा करात ८ हजार ६८१ कोटींचा परतावा मिळाला असल्याचीही माहिती अजित पवार यांनी सभागृहात दिली.
हेही वाचा…“मराठा आरक्षण आंदोलनकर्त्यांचा बोलवता धनी कोण ?” SIT ची चौकशीची मागणी, सभागृहात एकच गोंधळ
अटल सेतू व कोस्टल रोडला जोडण्यासाठी २ बोगद्यांचं बांधकाम हाती घेण्यात आल्याची माहिती अजित पवारांनी यावेळी दिली. तसेच नागपुर मिहान प्रकल्पाच्या भुसंपादन व इतर कामांकरिता १०० कोटींच्या निधीची तरतुद करण्यात आली आहे. नवी मुंबई विमानतळाचं काम वेगाने सुरू असून पहिला टप्पा मार्च २०२४ पर्यंत कार्यान्वित होईल. तर ग्रामविकास विभागास ९२८० कोटी रूपये गृह, परिवहन, बंदरेविभागास ४०९४ सामान्य प्रशासनन विभागास १४३२ कोटी रूपायंची तरतुद करण्यात आली आहे.
हेही वाचा…“विदर्भामध्ये वसुली गॅंग बसलीय”, शिंदे गटात प्रवेश करताच ‘या’ महिला नेत्याने ठाकरेंवर चढवला हल्ला
छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू सहकारी वीर जीवा महाला यांच्या स्मारकासाठी प्रतापगडाच्या पायथ्याची जागा उलब्ध करून त्यांचं तिथे स्मारक केलं जाणार आहे. होता जीवा म्हणूून वाचला शिवा माहिती आहे का ? असा सवालही यावेळी अजित पवारांनी केला. तर अर्थ विभागासाठी २०८ कोटी रूपयांच्या निधीची तरतुद करण्यात आली आहे. तसेच स्वातंत्र्यसैनिकांचे निवृत्ती वेतन प्रतीमाह १० हजार रूपायांवरून दुप्पट म्हणजे २० हजार करण्यात आली आहे.
सांस्कृतिक कार्य विभागासाठी ११८६ कोटी, पर्यटन विभागाला १९७३ कोटी, सार्वजनिक बांधकाम इमारत विभागाला १३६७ कोटी तर महसुल ४७४ कोटींचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. तर वरळीत आधुनिक कौशल्य विकास केंद्राची उभारणी केली जाणार आहे. तर क्रिडा विभागासाठी ५३७ कोटींच्या निधीची तरतुद करण्यात आल्याची माहिती अजित पवारांनी दिली.
अयोध्या व श्रीनगरमध्ये महाराष्ट्र भवन बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दोन्ही ठिकाणी राज्य शासनाने मोक्याच्या जागा उपलब्ध करून घेण्यात आल्या आहेत. त्यासाठी ७७ कोटींची तरतुद प्रस्तावित आहे.
READ ALSO :
हेही वाचा…जागावाटपाचा मुद्दा महायुतीत ठरणार कळीचा , शिंदे गट १८ जागांवर आग्रही तरअजितदादांकडून अधिकच्या जागांची मागणी
हेही वाचा…मोठी बातमी…! ठाकरे गटाचा आणखी एक ‘हा’ माजी नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत दाखल
हेही वाचा…मराठा आरक्षणाबाबत आणखी आनंदाची बातमी..! राज्य सरकारने घेतला ‘हा’ निर्णय
हेही वाचा…“विरोधकांनी आयमाय काढली तरीही हा फडणवीस तुमच्या बाजूने उभा राहिल”, फडणवीसांनी दिली ग्वाही
हेही वाचा..“आंदोलनाची एसआयटी मार्फत चौकशी, फडणवीसांनी जरांगेंना ललकारलं,” जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…