मुंबई : शिवसेना पक्ष फुट पडल्यानंतर दीड वर्षानंतरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात इनकमिंग सुरूच आहे. दोन दिवसापुर्वी ठाकरे गटाच्या पुर्व विदर्भ महिला आघाडीच्या संघटक आणि प्रवक्त्या शिल्पा बोडखे यांनी ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. यातच आता मुंबईतील आणखी ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांनी ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.
हेही वाचा…मराठा आरक्षणावर शरद पवार अन् उद्धव ठाकरे गप्प का ? भाजप नेत्याचा सवाल
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी मुंबईतील समाजवादी पक्षाचे माजी नगरसेवकर अख्तर कुरेशी आणि उबाठा गटाचे माजी नगरसेवक स्वप्निल टेंबवलकर आणि वर्षा टेंबवलर यांनी वर्षा या निवासस्थानी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी देखील शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा…“पार्लमेंटमध्ये नवरा जाणार आहे की मी जाणार”, सुप्रिया सुळेंनी अजितदादांना डिवचलं
दरम्यान, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताच शिंदेंनी त्यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपवली आहे. शिवसेनेच्या गोरेगाव विधानसभाप्रमुखपदी स्वप्निल टेंबवलकर यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी शिवसेना सचिव संजय मोरे, शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे, माजी नगरसेवक राम रेपाळे तसेच पश्चिम उपनगरातील शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
READ ALSO :
हेही वाचा…मराठा आरक्षणाबाबत आणखी आनंदाची बातमी..! राज्य सरकारने घेतला ‘हा’ निर्णय
हेही वाचा…“विरोधकांनी आयमाय काढली तरीही हा फडणवीस तुमच्या बाजूने उभा राहिल”, फडणवीसांनी दिली ग्वाही
हेही वाचा..“आंदोलनाची एसआयटी मार्फत चौकशी, फडणवीसांनी जरांगेंना ललकारलं,” जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…
हेही वाचा…“मराठा आरक्षण आंदोलनकर्त्यांचा बोलवता धनी कोण ?” SIT ची चौकशीची मागणी, सभागृहात एकच गोंधळ
हेही वाचा…“विदर्भामध्ये वसुली गॅंग बसलीय”, शिंदे गटात प्रवेश करताच ‘या’ महिला नेत्याने ठाकरेंवर चढवला हल्ला