मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानभवनात बहुमत चाचणी सिद्ध करून शिंदे सरकार सरकार टिकवलं आहे. भाजप आणि शिंदे गटाकडून 164 आमदारांनी मतदान केलं तर महाविकास आघाडीकडून 99 आमदारांनी मतदान केलं आहे. मात्र मतदान सुरू होण्याच्या अगोदर शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी असलेला आमदार संतोष भांगर हे शिंदे गटात सामील झाले आहेत. तसेच समाजवादी पक्षाचे आमदार तटस्थ राहिले आहेत.
“कधी शिवबंधन तर कधी शपथा आणि आता काय ते प्रतिज्ञापत्र”
एकनाथ शिंदे यांच्यावर बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा खुप मोठा प्रभाव होता. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री असा प्रवास राहिला आहे. ज्या व्यक्तीमध्ये कर्तृत्व असतंय त्यांना पद महत्वाचं नसतं. एकनाथ शिंदे यांचं अनेक वेळा पंख छाटण्याचे देखील प्रयत्न केले गेले आहेत, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
सगळ्यांना वाटलं की फडणवीस मुख्यमंत्री बनतील, पण मोदी, शहांनी माझ्यावर विश्वास दाखवला
हिंगोली येथे शिवसैनिकांसमोर संतोष भांगर यांनी जोरदार भाषण दिलं होतं. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासाठी अश्रू देखील ढाळले होते. आज मी शिवसेनेसोबत आणि ठाकरेंसोबत आहे. म्हणून शिवसैनिकांनी माझं जोरदार स्वागत केलं. माझ्या पाठीवर शाबासकीची शपथ दिली. पण मी जर बंडखोरांसोबत गेलो असतो तर माझी अवस्था काय झाली असती. मी शिवसेनेत आहे म्हणून मला किमंत आहे. नाहीतर माझी लायकी काय? अशा आशायची भाषणं संतोष भांगार यांनी केली होती.
विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांची निवड, ‘या’ तीन आमदारांची तटस्थ भूमिका!
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने आज विधानसभेसाठी निवडणुकीसाठी मतदान होत आहे. अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. राहुल नार्वेकर यांनी बहुमताचा आकडा पार केला आहे. राहुल नार्वेकर यांना 164 मते तर राजन साळवी यांना 107 मते मिळाली. त्यामुळे राहुल नार्वेकर यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.
Read also
- राहुल नार्वेकर देशातील तरूण विधानसभा अध्यक्ष; देवेंद्र फडणवीस
- “शिवसेनेचा कार्यकर्ता 20 रुपयांचा वडापाव खावून प्रचार करतो”; बंडखोर आमदाराचं वक्तव्य
- आरे मेट्रो कारशेडबाबत आता मनसेचा प्रंचड विरोध; अमित ठाकरेंची सनसनीत पोस्ट
- आदित्य ठाकरे पक्षातील घाण गेली म्हणतात, अन् ठाकरे बंडखोर आमदारांना आवाहन करतात
- ब्रिजभूषण सिंहांकडून शरद पवार ‘चितपट’; महाराष्ट्र कुस्ती परिषद बरखास्त