मुंबई : माझ्यावरचा राग माझ्यावरच काढा तो मुंबईवर काढू नका, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील आरेबाबत विरोध केला होता. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आरे मेट्रो कारशेडला परवानगी दिली. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्याबरोबर मनसेने देखील आरेबाबत विरोध दर्शविला आहे. मनसे नेते अमित ठाकरे यांनी यासंदर्भात एक फेसबुक पोस्ट करत आरे मेट्रो कारशेड बाबत विरोध दर्शविला आहे. त्यामुळे आता राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं चिघळलं आहे.
शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळातून पाटलांचा पत्ता कट; भाजपच्या नव्या चेहऱ्यांना संधी
मेट्रो कारशेड आरे जंगलातच करण्याचा नव्या सरकारने घेतलेला निर्णय माझ्यासारख्या असंख्य पर्यावरणप्रेमींसाठी धक्कादायक आहे. आरेमध्ये कारशेड होऊ नये म्हणून शेकडो तरुण तरुणींनी संघर्ष केला होता. काहींना तर पोलिसांनी गजाआड टाकलं होतं. आपल्याला विकास हवाच आहे, पण पर्यावरणाचा बळी देऊन नको. आपलं पर्यावरण उद्ध्वस्त झालं तर भविष्यात राजकारण करायला माणूस नावाचा प्राणी शिल्लकच राहणार नाही, याचं भान सर्व राजकीय नेत्यांनी बाळगायला हवं. नवे मुख्यमंत्री आणि नवे उपमुख्यमंत्री यांनी आरेतील मेट्रो कारशेडबाबतच्या आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा असं अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आरे मेट्रो कारशेडला परवानगी दिली. त्यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या काळजात कट्यार घुसवू नका, आरेचा निर्णय बदलला, त्यामुळे दुख: झालं असून तो प्लॉट कुणाचा खासगी नाही, असा इशारा देखील उद्धव ठाकरेंनी दिला. यावर आता भाजपने उद्धव ठाकरे यांच्यावर टिका केली आहे.
शिवसेना उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदेंची ? अखेर या प्रश्नावरील पेच सुटला
एव्हाना आपण म्हणजे मुंबई नव्हे हे माजी मुख्यमंत्र्यांना समजायला हवं होतं. पंरतु शरद पवारांशिवाय महाराष्ट्रात सरकार स्थापन झाल्याने या दु:खाने ते सावरू शकले नसावे. परत एकदा सांगतो, तुम्ही म्हणजे मुंबई नाही, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही. असा टोला भाजप आमदार रामसातपुते यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. तर आम्ही फक्त जनतेच्या हितासाठी निर्णय घेतला आहे. असं एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.
Read also
- आदित्य ठाकरे पक्षातील घाण गेली म्हणतात, अन् ठाकरे बंडखोर आमदारांना आवाहन करतात
- ब्रिजभूषण सिंहांकडून शरद पवार ‘चितपट’; महाराष्ट्र कुस्ती परिषद बरखास्त
- “कधी शिवबंधन तर कधी शपथा आणि आता काय ते प्रतिज्ञापत्र”
- शिवसैनिकांनी आपल्या जनतेच्या सेवेसाठी..;” दिपाली सय्यद यांनी कार्यकर्त्यांना केलं आवाहन
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना नेतेपदावरून काढल्यावर बंडखोर आमदार आक्रमक