मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमधील विधानसभा अध्यक्षांची निवडणुक लवकरच होणार आहे. तसेच येत्या ४ जुलै रोजी विधानभवनात शिंदे सरकारला बहुमत सिद्ध करण्याच्या सुचना राज्यापालांनी दिल्या आहेत. भाजपकडून राहुल नार्वेकर तर शिवसेनेकडून राजन साळवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या शपथविधी लवकरच पार पडणार असून त्यामध्ये भाजपच्या अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार असल्याची शक्यता आहे.
शिवसेना उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदेंची ? अखेर या प्रश्नावरील पेच सुटला
सुरूवातीला भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी देवेंद्र फडणवीस इच्छुक होते, मात्र ऐनवेळी भाजपच्या अध्यक्षांनी आदेश दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अशातच आता भाजपचे नेते चंद्रकांत पाटलांचा शिंदे सरकारमध्ये सामील करण्यात येणार नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्याकडे पक्ष वाढविण्यासाठी प्रदेशाध्यक्षपदाचीच जबाबदारी देण्यात येणार आहे.
विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीसाठी आघाडीकडून मोठी खेळी; शिवसेना आमदारालाच दिली उमेदवारी
नव्या सरकारमध्ये भाजपकडून गिरीश महाजन, आशिष शेलार आणि सुधीर मुनगंटीवार यांना कॅबिनेट मंत्री पद मिळणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. त्याचबरोबर जयकुमार रावल, मनिषा चौधरी आणि यांच्या नावाची देखील चर्चा आहे. तसेच शिंदे गटातून दादा भुसे, उदय सामंत, गुलाबराव पाटील, दिपक केसरकर, अब्दुल सतार, बच्चू कडू, आणि संजय शिरसाठ यांच्यादेखील नावाची चर्चा आहे.
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केली मोठी कारवाई; पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका
दरम्यान, मंत्रिपदावरून शिंदे गटात रस्सीखेस देखील बघायला मिळत आहे. औरंगाबाद जिल्ह्यात अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, यांना मंत्रीपद मिळणार असून संजय शिरसाठांना डावलण्यात येणार असून ते सध्या नाराज आहे. अशीही माहिती समोर येत आहे.
Read also
- ब्रिजभूषण सिंहांकडून शरद पवार ‘चितपट’; महाराष्ट्र कुस्ती परिषद बरखास्त
- “कधी शिवबंधन तर कधी शपथा आणि आता काय ते प्रतिज्ञापत्र”
- शिवसैनिकांनी आपल्या जनतेच्या सेवेसाठी..;” दिपाली सय्यद यांनी कार्यकर्त्यांना केलं आवाहन
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना नेतेपदावरून काढल्यावर बंडखोर आमदार आक्रमक
- मुख्यमंत्री पदाची सुत्रे हातात घेताच ‘शिंदें’ अँक्शन मोडवर; भुजबळांनी मंजुर केलेल्या 600 कोटींच्या कामांना लावला ब्रेक