मुंबई : शिवसेनेविरोधात महाराष्ट्रातील सर्वात मोठ बंड करून मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे यांच्याविरोधात सेनेनी मोठी कारवाई केली आहे. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या नेतेपदावरून एकनाथ शिंदे यांची पक्षविरोधात कारवाई केल्यानंतर हाकालपट्टी करण्यात आली आहे. सेनेची एकनाथ शिंदे यांच्यावर ही दुसऱ्यांदा मोठी कारवाई करण्यात आली आहे.
“राज्यमंत्रीऐवजी कॅबिनेट मंत्री द्या”, बच्चू कडूंची मागणी; तर मंत्रिपदावरून शिंदे गटात प्रचंड नाराजी
विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांनी सेनेच्या काही आमदारांना घेऊन बंड केलं होतं. सुरूवातीला सुरत आणि त्यानंतर गुवाहाटीला सेनेचे जवळपास 39 आमदार आणि इतर अपक्ष आमदारांसह 47 आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले होते. त्यामुळे पहिल्यांदा एकनाथ शिंदे यांची गटनेता पदावरून शिवसेनेने हाकालपट्टी केली होती.
“लक्षात ठेवा.. यापुढेही बराच राजकीय प्रवास करायचा आहे”; राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र
शिवसेनेच्या घटनेत शिवसेना प्रमुख हे पद सर्वोच्च आहे आणि फक्त शिवसेना पक्षप्रमुखांनाच राष्ट्रीय कार्यकारिणीच्या संगनमताने कुणालाही पक्षातून काढण्याचा अधिकार आहे. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, मनोहर जोशी, सुधीर जोशी, लिलाधर डाके, सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम, संजय राऊत, गजानन किर्तीकर हे राष्ट्रीय कार्यकारणीच्या ठरावानुसार 9 जण पक्षनेते आहेत. यापैकी सुधीर जोशी यांचं निधन झालं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर फडणवीसांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ
उद्धव ठाकरेंनी पक्ष प्रमुख म्हणून अनंत गीते, चंद्रकांत खैरे, आनंदराव अडसुळ, एकनाथ शिंदे यांची नियुक्ती केली होती. आता पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची नेतेपदावरून हकालपट्टी केली आहे. तसेच शिवसेनेकडून 16 आमदारांच्या निलंबनाबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याची सुनावणी येत्या 11 जुलै रोजी होणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यावर टांगती तलवार कायम आहे.
Read also
- राज्यात शिंदे सरकार येताच शरद पवारांना मोठा धक्का
- “शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी मोठा त्याग केला”
- “तुम्ही म्हणजे मुंबई नाही, अन् महाराष्ट्रही नाही”; आरे कारशेडवरून ठाकरेंना भाजपचा टोला
- विधानसभा अध्यक्षासाठी भाजपकडून नव्या चेहऱ्याला संधी
- विधानसभा अध्यक्षासाठी भाजपकडून नव्या चेहऱ्याला संधी