मुंबई : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आता सरकारमध्ये मोठे बदल होताना दिसत आहे. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी संजय राऊतांची इडीकडून तब्बल १० तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना देखील आयटीकडून नोटीस पाठवण्यात आली. तर अशातच अजून एक मोठा धक्का बसला आहे.
“लक्षात ठेवा.. यापुढेही बराच राजकीय प्रवास करायचा आहे”; राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र
शरद पवार अध्यक्ष असलेली महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्यात आली आहे. महारासंघाच्या सुचनांनुसार १५ आणि २३ वयोगटातील कुस्ती स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेनं नं केल्यानं कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे दिल्लीत झालेल्या संघटनेच्या वार्षिक सभेत भारतीय कुस्ती संघटनेकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर फडणवीसांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आव्हान देणारे भाजपचे खासदार बृजभुषण सिंग हे भारतीय कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आहेत. तर विनोद तोमर हे सचिव आहेत. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे शरद पवार हे अध्यक्ष आहेत तर बाबासाहेब लांडगे हे ४० वर्षांहुन अधिक काळ सचिव आहेत. बाबासाहेब लांडगे यांच्या मनमानी कारभाराविरूद्ध काही दिवसांपुर्वी पुण्यात पैलवानांनी आंदोलन देखील केलं होतं.
“ना, फडणवीस, ना ठाकरे यंदा एकनाथ शिंदे करणार विठ्ठालाची शासकीय महापुजा”
दरम्यान, अयोध्या दौऱ्याच्या वेळी बृजभुषण सिंग यांनी राज ठाकरे यांना आव्हान दिलं होतं. त्यावेळी राज्यातील राजकारण चांगलचं तापलं होतं. तर मनसे आणि भाजपकडून शरद पवार आणि बृजभुषण सिंग यांचा फोटो व्हायरल करून आयोध्या दौऱ्याबाबत शरद पवारांच हात असल्याचा आरोप केला जात आहे. मात्र शरद पवार आणि बृजभुषण यांचे चांगले संबंध असल्याचं त्यानंतर राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलं.
Read also
- “शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी मोठा त्याग केला”
- “तुम्ही म्हणजे मुंबई नाही, अन् महाराष्ट्रही नाही”; आरे कारशेडवरून ठाकरेंना भाजपचा टोला
- विधानसभा अध्यक्षासाठी भाजपकडून नव्या चेहऱ्याला संधी
- विधानसभा अध्यक्षासाठी भाजपकडून नव्या चेहऱ्याला संधी
- “राज्यमंत्रीऐवजी कॅबिनेट मंत्री द्या”, बच्चू कडूंची मागणी; तर मंत्रिपदावरून शिंदे गटात प्रचंड नाराजी