मुंबई : राज्याच्या राजकारणात खुप मोठ्या प्रमाणात उलटफेर झाल्याचे बघायला मिळाले आहे. बुधवारी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. त्याआधी पंढरपुरच्या विठ्ठालाची शासकीय महापुजा कोण करणार? यामध्ये भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार खडांजगी बघायला मिळाली होती.
महाराष्ट्राला पुन्हा एकदा सेनेचा मुख्यमंत्री; देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय
राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी नेहमी सांगत होते की, काहीही झालं तरी यंदा आषाढी एकादशीला विठ्ठालाची महापुजा ही उद्धव ठाकरेचं करतील. तर देवेंद्र फडणवीस यांना तो मान यंदातरी मिळणार नाही, अशा पद्धतीचं देखील वक्तव्य अमोल मिटकरी यांनी केलं होतं. त्यामुळे ना देवेंद्र फडणवीस ना, उद्धव ठाकरे आता शासकीय महापुजेचा मान हा एकनाथ शिंदे यांना मिळणार आहे.
एकनाथ शिंदे मुंबईत दाखल होताच, म्हणाले, “मीच शिवसेनेचा गटनेता”
येत्या 10 जुलै रोजी आषाढी एकादशी साजरी केली जाणार असून त्यासाठी महाराष्ट्रातून वारकरी पायी प्रवास करून पंढरपुरमध्ये दाखल होत आहेत. विठ्ठलाच्या शासकीय पुजेचा मान हा अनेक वर्षापासून मुख्यमंत्र्यांकडे आहे. आजपर्यंत सर्वाधिक वेळा हा शासकीय पुजेचा मान दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना मिळाला आहे. मागील वर्षी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पत्नी रश्मी ठाकरे यांनी पुजा केली होती.
मोठी बातमी : नवीन सरकारचा आज सायंकाळी ७ वाजता शपथविधी
दरम्यान, राज्यात आता नवे सरकार स्थापन होणार असून शासकीय महापुजा ही एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. काल बुधवारी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. येत्या दोन दिवसात बहुमत सिद्ध करण्यासाठी अधिवेशन बोलवण्यात आलं आहे. तर उद्या विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे.
Read also
- सातारा जिल्हा राजकारणाच्या केंद्रस्थानी; एकनाथ शिंदे सातारा जिल्हातील 4 थे मुख्यमंत्री
- शिंदे सरकारमध्ये विधानसभा अध्यक्षांसाठी केसरकर, विखेपाटील चर्चेत; उद्या अधिवेशन
- “पहिल्या दिवसापासून सरकार पडेल, असं कोणतही वक्तव्य करणार नाही”
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर फडणवीसांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ
- बारामतीच्या दादाची जागा कोथरूडचा दादा घेणार; अन् फडणवीस महाराष्ट्र पालथा घालणार