मुंबई : शिवसेनेविरोधात बंड करून एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी शपथ घेतली. राज्यात जवळपास 9 दिवस चाललेल्या या सत्ता नाट्यात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार निशाणा साधला. तसेच भाजपमध्ये गेल्यास तुम्हाला काहीही मिळणार नाही, असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं होतं. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आल्यानंतर राऊतांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.
15 तासानंतर राज ठाकरेंचं उद्धव ठाकरेंबाबत ट्विट; म्हणाले की,”एखादा माणूस ज्यादिवशी..”;
अडीच वर्षापुर्वी शिवसेना भाजप युती झाली असती तर आज फडणवीस मोठ्या पदावर असते. त्यावेळी त्यांनी मोठं मन दाखवायला हवं होतं. मात्र फडणवीस यांची मोठ्या मनाची व्याख्या वेगळी दिसते. शिवसेना फोडण्याचा प्लॅन त्यांनी पुर्ण केला आहे. आजही मुख्यमंत्री शिंदे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मानत असतील तर याचा आनंदर आहे. असंही संजय राऊतांनी म्हटलं आहे.
फडणवीस मंत्रीमंडळ : राहुल कुल की महेश लांडगे.. कुणाला मिळणार संधी?
ज्याठिकाणी ठाकरे त्याठिकाणी शिवसेना हे सेनेचं सुत्र आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हेच आमचे नेते राहतील. उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी मिळून राज्याचा कारभार पुढे न्यावा यासाठी आमच्या शुभेच्छा आहेत. पहिल्या दिवसापासून सरकार पडेल असं कोणतही वक्तव्य करणार नाही. असंही म्हणत त्यांनी भाजपला अप्रत्यक्ष टोला लगावला. शिवसैनिक म्हणून मुख्यमंत्री शिंदेंना भाजपने घेतलं असेल तर त्याचा आनंद आहे. असंही संजय राऊत म्हणाले.
मोठी बातमी : नवीन सरकारचा आज सायंकाळी ७ वाजता शपथविधी
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काल कॅबिनेट बैठक पार पाडली. या बैठकीत राज्यातील रखडलेल्या प्रकल्पांवर चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. तसेच उद्या अधिवेश होत असून शिंदे सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश राज्यपालांनी दिले आहेत. तसेच आज दुपारी 12 वाजता संजय राऊत इडीच्या कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहणार आहेत.
Read also
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर फडणवीसांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ
- बारामतीच्या दादाची जागा कोथरूडचा दादा घेणार; अन् फडणवीस महाराष्ट्र पालथा घालणार
- महाराष्ट्राला पुन्हा एकदा सेनेचा मुख्यमंत्री; देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय
- एकनाथ शिंदे मुंबईत दाखल होताच, म्हणाले, “मीच शिवसेनेचा गटनेता”
- मोठी बातमी : नवीन सरकारचा आज सायंकाळी ७ वाजता शपथविधी