मुंबई : एकनाथ शिंदे यांनी केलेलं शिवसेनेतील बंड हे महाराष्ट्रातील सर्वात मोठं बंड होतं. त्यानंतर जवळपास 9 दिवस राज्यात मोठ्या राजकीय वादळी घटना घडल्या. यामध्ये उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपला सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला. नव्या मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीसचं मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चेंना फटकारत देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून घोषणा करून सगळ्यानांच धक्कातंत्र दिलं. त्याचबरोबर मंत्रिमंडळात आपण राहणार नसल्याचं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात एक नवी राजकीय खेळी खेळल्याचं बोलण्यात येत आहे.
२५ हजार कोटींची फाईल्स असेल तर मंजूर कशी करणार? अजित पवार कॅबिनेट मंत्र्यांवरच संतापले
एकनाथ शिंदे यांचा आज सांयकाळी फक्त मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. तसेच मुंबईत पावसाचं वातावरण असल्याकारणाने अगदी मुख्यमंत्री पदाचा शपथविधी कार्यक्रम पार पडणार असल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या रूपात आता महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे सर्मथकांनी मोठा जल्लोष साजरा केला आहे.
..त्यादिवशी नक्कीच सत्याचा विजय होईल; रोहित पवारांचं सुचकं वक्तव्य
महाविकास आघाडी सरकारने गेल्या अडीच वर्षात कोणतीही विकासाची कामे केली नाहीत. राज्याच्या इतिहासात दोन मंत्री भ्रष्टाचारामुळे तुरूंगात आहेत. ही आश्चर्याची आणि खेदजनक बाब होती. एकीकडे बाळासाहेबांनी देशाचा शत्रू असलेल्या दाऊदचा विरोध केला. तर दुसरीकडे त्याच्याशी संबंधित मंत्री तुरूंगात जातो त्याला मंत्रीपदावरून काढलं नाही. असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
“लढता लढता हरलो जरी, हरल्याची मला खंत नाही”; रूपाली चाकणकरांचं ट्विट व्हायरल
दरम्यान, महाविकास आघाडी सरकार अल्पमतात असताना त्यांनी कॅबिनेट बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत मंत्रिमंडळाने अनेक निर्णय घेतले आहेत. परंतु पुढच्या सरकारच्या काळात हे निर्णय अवैध राहतील असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री पद मिळणार असल्याने ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष साजरा केला आहे.
Read also
- एकनाथ शिंदे मुंबईत दाखल होताच, म्हणाले, “मीच शिवसेनेचा गटनेता”
- मोठी बातमी : नवीन सरकारचा आज सायंकाळी ७ वाजता शपथविधी
- 15 तासानंतर राज ठाकरेंचं उद्धव ठाकरेंबाबत ट्विट; म्हणाले की,”एखादा माणूस ज्यादिवशी..”;
- फडणवीस मंत्रीमंडळ : राहुल कुल की महेश लांडगे.. कुणाला मिळणार संधी?
- इडीचे अधिकारी आता कुलुप आणायला गेलेत; राष्ट्रवादीचा भाजपवर हल्लाबोल