मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे भाजप आणि इडीचा हात असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून केला जात आहे. कारण राज्याच्या सत्तासंघर्षात देखील शिवसेनेचे खासदार संजय राऊतांना इडीची नोटीस आली. तर शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी देखील इडीच्या भितीला घाबरून मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं असल्याची माहिती समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीने भाजपवर खोचक टोला लगावला आहे.
“मला माझ्याच लोकांनी दगा दिला”; उद्धव ठाकरेंनी घेतले 10 ऐतिहासिक निर्णय
देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता गमवल्यानंतर महाविकास आघाडीतील काही नेत्यांवर इडीचा ससेमिरा कायम राहिला आहे. भाजपनेते किरीट सोमय्यांनी तर आघाडीतील मंत्र्यांचीच यादी जाहीर करून टाकली होती. महाविकास आघाडीच्या सत्ता काळात अडीच वर्षात अनेक मंत्र्यांना इ़डीची नोटीस देखील देण्यात आली आहे. तर अनेकांवर इडीचा ससेमिरा अजूनही आहे.
उद्धव ठाकरेंचा शेवटचा मास्टरस्ट्रोक; अखेर औरंगाबादचे नाव ‘संभाजीनगर’
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संबंधित व्यक्तींवर देखील इडीने आणि आयटी विभागाने धाड टाकली होती. तसेच राष्ट्रवादी नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना देखील इडीच्या कारवाईनंतर तुरूंगात जावं लागलं आहे. अशा सर्व घटना पाहता भाजपने नेहमी केंद्रीय तपास यंत्रणाचा गैरवापर केला असल्याचा आरोप आता भाजपवर केला जात आहे.
पुणे शहराचं नाव जिजाऊनगर करा; कॅबिनेट मंत्रिमंडळात काॅंग्रेसची मोठी मागणी
दरम्यान, बुधवारी उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार सत्ता स्थापन करणार आहे. यामध्ये बंडखोर आमदारांना देखील मंत्रिमंडळात स्थान देण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे पुण्याचे शहाराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. इडीचे अधिकारी आता कुलुप आणायला गेले आहेत, असं म्हणत त्यांनी केंद्रीय तपास यंत्रणांवर देखील टिका केली आहे.
ED चे अधिकारी कुलूप आणायला गेलेत.
— Prashant Sudamrao Jagtap (@JagtapSpeaks) June 29, 2022
Read also
- २५ हजार कोटींची फाईल्स असेल तर मंजूर कशी करणार? अजित पवार कॅबिनेट मंत्र्यांवरच संतापले
- ..त्यादिवशी नक्कीच सत्याचा विजय होईल; रोहित पवारांचं सुचकं वक्तव्य
- “लढता लढता हरलो जरी, हरल्याची मला खंत नाही”; रूपाली चाकणकरांचं ट्विट व्हायरल
- काय ती झाडी, काय तो डोंगार? एकदम ओके सरकार; अमोल मिटकरींचा खोचक टोला
- देवेंद्र फडणवीसांचं ‘असं’ असेल नवे मंत्रिमंडळ; नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी