मुंबई : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपने पेढेवाटून आनंद साजरा केला. तर काही ठिकाणी मध्यरात्री फटाके देखील फोडण्यात आले. मात्र एक सुसंस्कृत मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला आणि त्यांचं नाव इतिहासात अजरामर राहिल, अशा प्रतिक्रिया देखील समाजमाध्यामांवर उमटल्या. आता याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी शहाजी बापू पाटलांवर निशाणा साधला आहे.
“संजय राऊतांना योग्यवेळी चुना लावू”; गुलाबराव पाटलांचा कडक इशारा
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील नवे मंत्रिमंडळ 1 जुलै रोजी शपथ घेण्याची शक्यता आहे. अशातच महाराष्ट्रात आता रामराज्य आले. भक्तांनी कालच एकमेकांचे तोंड गोड केले. इथून पुढे शेतकऱ्यांचे पुर्ण कर्ज माफ होणार. पेट्रोल 50 रू, गॅस 250 रू होणार. महाराष्ट्रा सुजलाम् सुफलाम् होणार. बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार. काय ती झाडी काय तो डोंगार ? एकदम ओके सरकार असं टोला देखील त्यांनी लगावला.
कुठे आणुन ठेवलीय बाळासाहेबांची शिवसेना? राजकीय नाट्यमय घडामोडींवर मनसेचा सवाल
उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्रीपदाचे ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे. तसेच अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा केला जात आहे. अशातच आता समाजमाध्यांमवर देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडाळाची संभाव्य यादी देखील प्रकाशित होत आहेत. याबाबत भाजपसोबत कोणती आणि किती मंत्रीपदे याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, लवकरच होईल. तोपर्यंत कृपया मंत्रिपदाच्या याद्या आणि याबाबत पसरलेल्या अफवा यावर विश्वास ठेवू नका, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
“शिंदेसाहेब शिवसेना हरता कामा नये”; दिपाली सय्यद यांचा सुर बदलला
दरम्यान, मंत्रिमंडळाच्या संदर्भात आज एकनाथ शिंदे मुंबईत येण्याची शक्यता आहे. त्यांच्यासोबत इतर काही आमदार देखील देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली जाणार असल्याची माहिती खात्रीशीर सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार ते आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महाराष्ट्रात आता रामराज्य आले . भक्तांनी कालच एकमेकांचे तोंड गोड केले.
इथून पुढे शेतकऱ्यांचे पुर्ण कर्ज माफ होणार, पेट्रोल ५० रू, गॅस २५० रू होणार. महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् होणार ! बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार .
काय ती झाडी काय तो डोंगार ?
एकदम ओके सरकार— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) June 30, 2022
Read also
- देवेंद्र फडणवीसांचं ‘असं’ असेल नवे मंत्रिमंडळ; नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी
- “मला माझ्याच लोकांनी दगा दिला”; उद्धव ठाकरेंनी घेतले 10 ऐतिहासिक निर्णय
- उद्धव ठाकरेंचा शेवटचा मास्टरस्ट्रोक; अखेर औरंगाबादचे नाव ‘संभाजीनगर’
- पुणे शहराचं नाव जिजाऊनगर करा; कॅबिनेट मंत्रिमंडळात काॅंग्रेसची मोठी मागणी
- “शरद पवारांनी ज्या माणसांना जवळ घेतलं, त्यांना काखेत दाबून मारलं”