मुंबई : बंडखोर आमदारांपैकी शहाजी पाटील यांचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. त्यानंतर त्यांचा हॉटेलमधील अजून एक व्हिडीओ आला असून त्यांनी यामध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टिकास्त्र सोडलं आहे. त्याआधी बंडखोर आमदारांनी राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसवर टिका कऱण्याची एकही संधी सोडली नाही.
गोव्यात भाजपचा शिजतोय मेगाप्लॉन; बंडखोर अन् भाजपचे आमदार आज गोव्यात दाखल होणार?
हॉटेलमध्ये बडंखोर आमदारांसमोर शहाजी पाटिल यांनी शरद पवारांवर भाष्य़ केलं आहे. त्यात ते म्हणताहेत की, वसंतदादा पाटील हे माझे वडील आहेत. त्यांच्या आशीर्वादाने मी आज मोठा झालेलो आहे आणि मी वसंतदादा पाटलांना कधीही दगा देणार नाही असं शरद पवार यांनी म्हटलं आहे असंही ते सांगत आहेत. ज्या ज्या माणसाला शरद पवारानं जवळ घेतलं, त्या त्या माणसाला काखेत दाबुन मारून टाकलं. हा किस्सा सांगितल्यावर बंडखोर आमदारांमध्येही हश्या पिकला. आमदार शहाजी पाटील यांनी वसंतदादा पाटील यांच्या राजकारणाची आठवण करून देताना त्यांनी शरद पवारांना कशी साथ दिली हे आवर्जून त्यामध्ये सांगतात दिसत आहेत.
बंडखोर आमदारांचा आसाममध्ये मास्टरस्टोक; महाराष्ट्रात येण्यापुर्वी आसामबाबत घेतला ‘हा’ निर्णय
त्यांच्या नादाला साहेब लावू नका, बाकी काय बी निर्णय घ्या. त्याला जवळ करायचं नाय, नायतर मेलो आपण. बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे यांच्यापेक्षाही शहाजी बापू पाटील यांच्या प्रत्येक वक्तव्याची दखल माध्यमांनी घेतली आहे. शहाजी पाटील या व्हिडीओमध्ये जे सांगत आहेत. त्याची मात्र आता जोरदार चर्चा होऊ लागली आहे. त्यावर आता राष्ट्रवादी काय प्रतिक्रिया देणार ते आता पहावं लागणार आहे?
गोव्यामध्ये ‘ताज कनेक्शन’; बंडखोर आमदारांना गुवाहाटीहून गोव्याला नेण्यासाठी स्पाईंसजेटचे विमान रवाना
मला टपरीवर पुन्हा पाठवू संजय राऊत सांगतात. चुना कसा लावतात माहिती नाही त्यांना अजून वेळ येईल तेव्हा मी लावले त्यांना चुना. आपण इथं कसे आलो आहोत हे सांगण्याची गरज नाहीय पण आता आपल्याला एकत्रितपणे ही लढाई लढायची आहे. आम्ही आमच्या घरी तुळशीपत्र ठेऊन काम केलेेले आहोत. त्यामुळे आयत्या बिळावर नागोबावाले नाही आहोत आम्ही. असा टोला गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांनी लगावला आहे.
Read also
- “संजय राऊतांना योग्यवेळी चुना लावू”; गुलाबराव पाटलांचा कडक इशारा
- सुखात असो की दु:खात आम्ही शिवसेनेच्या पाठिशी राहणार
- कुठे आणुन ठेवलीय बाळासाहेबांची शिवसेना? राजकीय नाट्यमय घडामोडींवर मनसेचा सवाल
- “शिंदेसाहेब शिवसेना हरता कामा नये”; दिपाली सय्यद यांचा सुर बदलला
- जादूटोणा केलायं म्हणून दर्शनासाठी जातोय; कामाख्या देवीच्या दर्शनावेळी बच्चू कडूंचा उपरोधित टोला