मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला बहुमत सिद्ध करण्याबाबत पत्र दिल्यानंतर लगेच राज्यपालांनी सरकारला पत्र पाठवलं आहे. या पत्रामध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सिंह यांनी उद्या बहुमत चाचणी घेण्याचे सरकारला म्हटले आहे. त्यामुळेच उद्याच महाविकास आघाडीसरकारचा भविष्य स्पष्ट होणार आहे. त्याआधी शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद यांनी एक ट्विट केलं आहे.
“एका बाजुला डुकरं, रेडा, कुत्रा, नाल्याची घाण म्हणायचं अन् दुसऱ्या बाजूला समेटची हाक द्यायची”
दिपाली सय्यद यांनी शिवसेनेच्या आमदारांना उद्देशून म्हटलं आहे की, हिंदुत्वाच्या मुद्यावरून युती झाली तर पुढची साडेसात वर्ष सत्तेची मग शिवसेनेला मुख्यमंत्री पद त्यात असणार का? असा सवाल उपस्थित केला आहे. तर बहुमत चाचणी करण्याअगोदर पक्षप्रमुखांशी बोलणार का? आदरणीय शिंदेसाहेब शिवसेना हरता कामा नये. शिवसैनिकांची मेहनत वाया जाऊ नये, असं देखील दिपाली सय्यद यांनी म्हटलं आहे.
“राजकीय अस्थिरता असताना सरकारने एकाच वेळी 160 जीआर काढले”; भाजपचं राज्यपालांना पत्र
सुरूवातीला दिपाली सय्यद यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आपल्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. मात्र आता एकनाथ शिंदे यांनी जवळपास उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्याचं चित्र स्पष्ट असताना दिपाली सय्यद यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यामुळे दिपाली सय्यद नेमकं कुणाकडून बोलत आहेत. असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.
” जे आरोप करीत आहेत, ते अगोदर राष्ट्रवादीमध्येच होते”; सुप्रिया सुळेंचा बंडखोर आमदारांवर निशाणा
गुवाहाटीमधील रेडिसन ब्लु हॉटेलमधून बंडखोर आमदार दोन लक्झरी बसने कामाख्या देवीच्या दर्शनासाठी निघाले. यावेळी रस्त्यावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मंदिराच्या परिसरात जात असताना बच्चू कडू यांनी जादूटोणा केला म्हणून दर्शनासाठी जात असल्याचं सांगत त्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. तर कामाख्या देवीच्या कृपेने सर्व काही होईल, उद्या बहुमत चाचणीसाठी मुंबईत जाणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
Read als
- जादूटोणा केलायं म्हणून दर्शनासाठी जातोय; कामाख्या देवीच्या दर्शनावेळी बच्चू कडूंचा उपरोधित टोला
- गोव्यात भाजपचा शिजतोय मेगाप्लॉन; बंडखोर अन् भाजपचे आमदार आज गोव्यात दाखल होणार?
- बंडखोर आमदारांचा आसाममध्ये मास्टरस्टोक; महाराष्ट्रात येण्यापुर्वी आसामबाबत घेतला ‘हा’ निर्णय
- गोव्यामध्ये ‘ताज कनेक्शन’; बंडखोर आमदारांना गुवाहाटीहून गोव्याला नेण्यासाठी स्पाईंसजेटचे विमान रवाना
- आमदारांनो उद्या सकाळपर्यंत मुंबईत या..! भाजपच्या सर्व आमदारांना वरिष्ठांकडून फोन