मुंबई : ठाकरे सरकारला उद्या बहुमत चाचणी करण्याचे निर्देश राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिले आहेत. त्यामुळे गुवाहाटीमध्ये बंडखोर आमदारांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. एकनाथ शिंदे उद्या बंडखोर आमदारासंह मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. त्याआधी एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व आमदारांनी गुवाहाटीमधील कामाख्या मंदिरात जाऊन कामाख्या देवीचं दर्शन घेतलं आहे. दर्शनावेळी जाताना बच्च कडू यांनी ठाकरे सरकारवर उपरोधित टोला लगावला आहे.
“राजकीय अस्थिरता असताना सरकारने एकाच वेळी 160 जीआर काढले”; भाजपचं राज्यपालांना पत्र
गुवाहाटीमधील रेडिसन ब्लु हॉटेलमधून बंडखोर आमदार दोन लक्झरी बसने कामाख्या देवीच्या दर्शनासाठी निघाले. यावेळी रस्त्यावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मंदिराच्या परिसरात जात असताना बच्चू कडू यांनी जादूटोणा केला म्हणून दर्शनासाठी जात असल्याचं सांगत त्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. तर कामाख्या देवीच्या कृपेने सर्व काही होईल, उद्या बहुमत चाचणीसाठी मुंबईत जाणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
” जे आरोप करीत आहेत, ते अगोदर राष्ट्रवादीमध्येच होते”; सुप्रिया सुळेंचा बंडखोर आमदारांवर निशाणा
छत्रपती शिवाजी महाराज की जय, माॅं कामाख्या देवी की जय, असे नारे देत सर्व बंडखोर आमदार कामाख्या देवीच्या मंदिरात पोहचले. यावेळी सर्व आमदारांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उठून दिसत होते. त्यांना झालेला आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता. तर काही आमदार आपल्या कार्यकर्त्यांना फोनवरून प्रत्येक अपडेट देत होते. तसेत आज बंडखोर आमदारांना स्पाईजजेठ विमानाने गोव्यात आणलं जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
“भूल थापांना बळी पडू नका, आजही तुमची काळजी वाटते, मुंबईत या” उद्धव ठाकरे
दरम्यान, आसाममध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी वित्त तसेच जीवित्तहानी झाली आहे. याच पार्श्वभूमीवर डॅमेज कंन्ट्रोल राखण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी आसाम मुख्यमंत्री फंडात 50 लाखांची मदत जाहीर केली आहे. उद्या बहुमत चाचणीसाठी हवामानाचा अंदाज लक्षात घेता त्यांना आज गोव्यातील ताज हॉटेलमध्ये आणण्यात येणार आहे. त्यानंतर उद्या सकाळी ते विधिमंडळात येण्याची शक्यता आहे.
Read als
- गोव्यात भाजपचा शिजतोय मेगाप्लॉन; बंडखोर अन् भाजपचे आमदार आज गोव्यात दाखल होणार?
- बंडखोर आमदारांचा आसाममध्ये मास्टरस्टोक; महाराष्ट्रात येण्यापुर्वी आसामबाबत घेतला ‘हा’ निर्णय
- गोव्यामध्ये ‘ताज कनेक्शन’; बंडखोर आमदारांना गुवाहाटीहून गोव्याला नेण्यासाठी स्पाईंसजेटचे विमान रवाना
- आमदारांनो उद्या सकाळपर्यंत मुंबईत या..! भाजपच्या सर्व आमदारांना वरिष्ठांकडून फोन
- “एका बाजुला डुकरं, रेडा, कुत्रा, नाल्याची घाण म्हणायचं अन् दुसऱ्या बाजूला समेटची हाक द्यायची”