मुंबई : राज्यपालांच्या आदेशानंतर आता महाविकास आघाडीला बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. त्याची तयारी देखील केली विधिमंडळाच्या परिसरात केली जात आहे. अशातच आता राजीनाम्याची स्क्रिप्ट ठरली असून संभाजी नगरच्या नामांतराचा आव आणायचा आणि आपले हिरवे प्रेम हेच खरे हिंदुत्व हे सिद्ध करायचे. असं म्हणत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आघाडीला डिवचलं आहे. तसेच कुठे आणुन ठेवलीय हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेबांची शिवसेना ? असा सवाल देखील त्यांनी केला आहे.
गोव्यामध्ये ‘ताज कनेक्शन’; बंडखोर आमदारांना गुवाहाटीहून गोव्याला नेण्यासाठी स्पाईंसजेटचे विमान रवाना
सरकार अल्पमतात आल्याने महाविकास आघाडीतील मंत्र्यांनी विकासकामांचा धडका लावला आहे. काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले. तर उद्या संभाजी नगरच्या नामांतराचा मुद्धा देखील चर्चेत येणार असल्याचे शिवसेनेचे आमदार आणि मंत्री अनिल परब यांनी म्हटले आहे. तसेच मागील काही दिवसातच ठाकरे सरकारने सर्वात जास्त 160 जीआर देखील काढले आहेत. यावरून भाजपने देखील राज्यपालांना पत्र पाठवले आहे.
आमदारांनो उद्या सकाळपर्यंत मुंबईत या..! भाजपच्या सर्व आमदारांना वरिष्ठांकडून फोन
राज्यपालांनी सरकारला बहुमत चाचणी करण्याचे आदेश दिल्यानंतर आता उद्याच चाचणी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. बहुचाचणीच्या वेळी आसन व्यवस्थेचा आढावा घेेण्यासाठी भाजपने राज्यपालांची भेट घेतली. यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तसेच त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर देखील भाष्य केलं आहे.
“एका बाजुला डुकरं, रेडा, कुत्रा, नाल्याची घाण म्हणायचं अन् दुसऱ्या बाजूला समेटची हाक द्यायची”
बहुमत चाचणीच्या वेळी विधिमंडळाच्या परिसरातील सुरक्षा व्यवस्था उत्तम, परिपुर्ण असावी यासाठी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, सचिव सचिव राजेंद्र भागवत यांची भेट घेतली. त्यांच्यासमोर आम्ही काही सुचना मांडल्यानंतर त्यांनी त्यासंदर्भात आश्वासन दिलं. वर्तमानपत्रातून तसेच काही टिव्ही चॅनेलच्या माध्यामातून काही लोक धमक्या, गुंडागिरीची भाषा, शांतता भंग करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे कोणत्याही आमदाराला आपला अधिकार शांतेता बजावता आलं. पाहिजे. यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली.
राजीनाम्याची ‘ स्क्रीप्ट ‘ठरली. संभाजी नगरच्या नामांतराचा ‘आव आणायचा आणि आपले ‘हिरवे प्रेम हेच खरे हिंदुत्व हे सिद्ध करायचे.. कुठे आणून ठेवलीये मा. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांची शिवसेना??
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) June 29, 2022
Read als
- खुर्ची तुटेपर्यंत ती सोडू नये, यासाठी लोकशाही आहे का? सुधीर मुनगंटीवारांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
- “शिंदेसाहेब शिवसेना हरता कामा नये”; दिपाली सय्यद यांचा सुर बदलला
- जादूटोणा केलायं म्हणून दर्शनासाठी जातोय; कामाख्या देवीच्या दर्शनावेळी बच्चू कडूंचा उपरोधित टोला
- गोव्यात भाजपचा शिजतोय मेगाप्लॉन; बंडखोर अन् भाजपचे आमदार आज गोव्यात दाखल होणार?
- बंडखोर आमदारांचा आसाममध्ये मास्टरस्टोक; महाराष्ट्रात येण्यापुर्वी आसामबाबत घेतला ‘हा’ निर्णय