मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा केली. त्यामुळे अनेक राजकीय विश्लेषकांना तसेच महाराष्ट्रातीय राजकीय नेत्यांना या निर्णयाचा मोठा धक्का बसला आहे. मात्र एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीस नसणार असल्याची त्यांनीच माहिती दिली आहे. यामागे देवेंद्र फडणवीस यांची मोठी राजकीय राजनीती आखली असल्याची माहिती समोर आली आहे.
फडणवीस मंत्रीमंडळ : राहुल कुल की महेश लांडगे.. कुणाला मिळणार संधी?
2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली 105 आमदार निवडून आणले होते. तसेच आगामी निवडणुकीत आम्ही 200 पार करणारच अशा पद्धतीचे वक्तव्य भाजपच्या नेत्यांकडून करण्यात येत होते. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष पद सोपवण्यात येणार असून आगामी निवडणुकीसाठी संपुर्ण महाराष्ट्र फिरणार असल्याची माहिती समोर आली आहे.
इडीचे अधिकारी आता कुलुप आणायला गेलेत; राष्ट्रवादीचा भाजपवर हल्लाबोल
तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडे नव्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच पुण्याच्या पालकमंत्र्यांची देखील जबाबादरी त्यांच्याकडे देण्यात येणार आहे. त्यामुळे आता अजित पवार यांची जागा चंद्रकांत पाटील घेणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे.
२५ हजार कोटींची फाईल्स असेल तर मंजूर कशी करणार? अजित पवार कॅबिनेट मंत्र्यांवरच संतापले
दरम्यान, एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. तसेच मी या मंत्रिमंडळात बाहेरून सरकारसोबत असणार आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं होतं. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीस मोठी रणनीती आखणार असल्याची चर्चा आहे.
Read also
- बारामतीच्या दादाची जागा कोथरूडचा दादा घेणार; अन् फडणवीस महाराष्ट्र पालथा घालणार
- महाराष्ट्राला पुन्हा एकदा सेनेचा मुख्यमंत्री; देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय
- एकनाथ शिंदे मुंबईत दाखल होताच, म्हणाले, “मीच शिवसेनेचा गटनेता”
- मोठी बातमी : नवीन सरकारचा आज सायंकाळी ७ वाजता शपथविधी
- 15 तासानंतर राज ठाकरेंचं उद्धव ठाकरेंबाबत ट्विट; म्हणाले की,”एखादा माणूस ज्यादिवशी..”;