सातारा : एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सातारा जिल्हाला चौथा मुख्यमंत्री मिळाला आहे. याआधी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशंवतराव चव्हाण, त्यानंतर बाबासाहेब भोसले, पृथ्वीराज चव्हाण यांच्यानंतर एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली आहे. त्यामुळे सातारा जिल्हा नेहमी राजकारणात अग्रेसर राहिला आहे.
एकनाथ शिंदे मुंबईत दाखल होताच, म्हणाले, “मीच शिवसेनेचा गटनेता”
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशंवत चव्हाण यांनी 19 नोव्हेंबर 1962 पर्यंत यांनी जबाबदारी पार पाडली. त्यावेळी ते सातारा जिल्ह्यातील कराड विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. त्यांना त्यावेळी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी केंद्रात बोलवून त्यांना संरक्षण मंत्री केले होते. त्यानंतर बाबासाहेब भोसले यांनी 29 जानेवारी 1982 ते 1 फेब्रुवारी 1983 असा त्यांचा कार्यकाळ राहिला आहे.
मोठी बातमी : नवीन सरकारचा आज सायंकाळी ७ वाजता शपथविधी
महाराष्ट्राचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांनी 10 नोव्हेंबर ते 2010 ते 26 सप्टेंबर 2014 असा कारभार संभाळला. त्यावेळी ते कराड मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले होते. त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी शपथ घेतली आहे. ते महाराष्ट्राचे 25 वे मुख्यमंत्री असून ते मुळेचे सातारकर आहेत. ठाण्यातील कोपरी पाचपाखाडी मतदारसंघाचे त्यांनी प्रतिनिधित्व केले असून ठाकरे सरकारच्या काळात त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून काम केलं आहे.
15 तासानंतर राज ठाकरेंचं उद्धव ठाकरेंबाबत ट्विट; म्हणाले की,”एखादा माणूस ज्यादिवशी..”;
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी केलेलं शिवसेनेतील बंड हे महाराष्ट्रातील सर्वात मोठं बंड होतं. त्यानंतर जवळपास 9 दिवस राज्यात मोठ्या राजकीय वादळी घटना घडल्या. यामध्ये उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपला सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला. नव्या मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीसचं मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चेंना फटकारत देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून घोषणा करून सगळ्यानांच धक्कातंत्र दिलं. त्याचबरोबर मंत्रिमंडळात आपण राहणार नसल्याचं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात एक नवी राजकीय खेळी खेळल्याचं बोलण्यात येत आहे.
Read also
- शिंदे सरकारमध्ये विधानसभा अध्यक्षांसाठी केसरकर, विखेपाटील चर्चेत; उद्या अधिवेशन
- “पहिल्या दिवसापासून सरकार पडेल, असं कोणतही वक्तव्य करणार नाही”
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर फडणवीसांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ
- बारामतीच्या दादाची जागा कोथरूडचा दादा घेणार; अन् फडणवीस महाराष्ट्र पालथा घालणार
- महाराष्ट्राला पुन्हा एकदा सेनेचा मुख्यमंत्री; देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय