मुंबई : शिवसेनेविरोधात महाराष्ट्रातील सर्वात मोठ बंड करून मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे यांच्याविरोधात सेनेनी मोठी कारवाई केली आहे. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या नेतेपदावरून एकनाथ शिंदे यांची पक्षविरोधात कारवाई केल्यानंतर हाकालपट्टी करण्यात आली आहे. त्यामुळे आता शिंदे गट देखील आक्रमक झाला आहे.
“शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी मोठा त्याग केला”
एकनाथ शिंदेंना नेतेपदावरुन काढणं आक्षेपार्ह आहे. शिवसेनेने अशी कृती करायला नको होती. सेनेचा तो निर्णय चुकीचा आहे. सेनेच्या या नोटीशीवर रीतसर उत्तर देऊ. याविरोधात न्यायालयात जाणार आहोत. यासोबतच आम्ही आजही शिवसैनिक आहोत. लोकांची दिशाभूल करण्याचं काम सुरू आहे. असं दिपक केसरकर म्हणाले आहेत. त्यामुळे आता गटनेता पद आणि त्यानंतर आता नेतेपदावरून एकनाथ शिंदे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
“तुम्ही म्हणजे मुंबई नाही, अन् महाराष्ट्रही नाही”; आरे कारशेडवरून ठाकरेंना भाजपचा टोला
विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांनी सेनेच्या काही आमदारांना घेऊन बंड केलं होतं. सुरूवातीला सुरत आणि त्यानंतर गुवाहाटीला सेनेचे जवळपास 39 आमदार आणि इतर अपक्ष आमदारांसह 47 आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले होते. त्यामुळे पहिल्यांदा एकनाथ शिंदे यांची गटनेता पदावरून शिवसेनेने हाकालपट्टी केली होती.
विधानसभा अध्यक्षासाठी भाजपकडून नव्या चेहऱ्याला संधी
शिवसेनेच्या घटनेत शिवसेना प्रमुख हे पद सर्वोच्च आहे आणि फक्त शिवसेना पक्षप्रमुखांनाच राष्ट्रीय कार्यकारिणीच्या संगनमताने कुणालाही पक्षातून काढण्याचा अधिकार आहे. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, मनोहर जोशी, सुधीर जोशी, लिलाधर डाके, सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम, संजय राऊत, गजानन किर्तीकर हे राष्ट्रीय कार्यकारणीच्या ठरावानुसार 9 जण पक्षनेते आहेत. यापैकी सुधीर जोशी यांचं निधन झालं आहे.
Read also
- मुख्यमंत्री पदाची सुत्रे हातात घेताच ‘शिंदें’ अँक्शन मोडवर; भुजबळांनी मंजुर केलेल्या 600 कोटींच्या कामांना लावला ब्रेक
- शिवसेना उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदेंची ? अखेर या प्रश्नावरील पेच सुटला
- विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीसाठी आघाडीकडून मोठी खेळी; शिवसेना आमदारालाच दिली उमेदवारी
- उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केली मोठी कारवाई; पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका
- राज्यात शिंदे सरकार येताच शरद पवारांना मोठा धक्का