मुंबई : एकनाथ शिंदे यांना सध्या शिवसेनेच्या 39 आमदारांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिंदेगटातील आमदारांनी शिवसेना ही आमचीच असल्याचा दावा केला तर तिकडे उद्धव ठाकरेंनी हा दावा चुकीचा ठरवत शिवसेना तुमच्या बापाची नाही. असं म्हणत एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. त्यानंतर शिवसेना नेमकी कुणाची असा प्रश्न सर्वांना पडला.
विधानसभा अध्यक्षासाठी भाजपकडून नव्या चेहऱ्याला संधी
अशातच विधानसभा अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून राजन साळवींच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे अध्यक्षपदासाठी आता राहुल नार्वेकर विरुद्ध राजन साळवी अशी थेट लढत होणार आहे. जर या निवडणुकीत भाजपचे आमदार राहुल नार्वेक विधान सभा निवडणुकीत विजयी झाले तर एकनाथ शिंदे यांच्या गटाला नव निर्वाचित अध्यक्ष मान्यता देण्याचा निर्णय घेतील. शिंदे गटाला शिवसेना एस म्हणून मान्यता मिळू शकते. एवढचंं नाही तर पुढील अडीच वर्ष किंवा पाच वर्षासाठी ही मान्यता मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
विधानसभा अध्यक्षासाठी भाजपकडून नव्या चेहऱ्याला संधी
छगन भुजबळ यांनी 1991 साली शिवसेनेच्या 54 आमदारांपैकी 18 आमदारांना घेऊन शिवसेनेविरोधात बंड पुकारला होता. त्यावेळी त्यांच्या गटालाही शिवसेना बी असं नाव देण्यात आलं होतं. याच नावाने त्यांचा स्वतंत्र गट स्थापन करण्यात आला होता. आताही भुजबळांप्रमाणेच शिवसेनेतील शिंदे गटालाही मान्यता मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
“राज्यमंत्रीऐवजी कॅबिनेट मंत्री द्या”, बच्चू कडूंची मागणी; तर मंत्रिपदावरून शिंदे गटात प्रचंड नाराजी
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आघाडीतील विकास कामांना ब्रेक लावण्यात आला आहे. एकनाथजी शिंदे यांनी नाशिक जिल्हा नियोजन समितीच्या 600 कोटींच्या कामांना ब्रेक लावला आहे. घाई घाईत कामांना मंजुरी कशासाठी?, असा सवालही मुख्यमंत्र्यांनी नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना विचारला आहे. जिल्हा नियोजन कार्यसमितीची घाईघाईने बैठक घेऊन 567 कोटींचे काम मंजूर केले होते. माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ हे ही कामे मंजूर करण्यात आली त्यावेळी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री होते.
Read also
- विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीसाठी आघाडीकडून मोठी खेळी; शिवसेना आमदारालाच दिली उमेदवारी
- उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केली मोठी कारवाई; पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका
- राज्यात शिंदे सरकार येताच शरद पवारांना मोठा धक्का
- “शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी मोठा त्याग केला”
- “तुम्ही म्हणजे मुंबई नाही, अन् महाराष्ट्रही नाही”; आरे कारशेडवरून ठाकरेंना भाजपचा टोला