मुंबई : एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची काल शपथ घेतली. राज्यापालांनी ३ ते ४ जुलै रोजी अधिवेशन घेण्याचं सांगितलं असून त्यात शिंदे सरकार बहुमत सिद्ध करणार आहे. त्याआधी विधानसभा अध्यक्षांसाठी भाजपकडून राहुल नार्वेकर यांच्या नावावर शिक्कामार्तोब करण्यात आला आहे. तर शिवसेनेकडून राजन साळवी यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे.
विधानसभा अध्यक्षासाठी भाजपकडून नव्या चेहऱ्याला संधी
विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीसाठी भाजपला टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडीकडून राजन साळवी यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे. राजन साळवी हे शिवसेनेचे राजापुर मतदारसंघाचे आमदार आहेत. अवघा काही वेळ शिल्लक असताना मविआकडून राजन साळवी यांच्या नावावर शिक्कामार्तोब कऱण्यात आला असून त्यांनी अर्ज दाखल केला आहे.
“राज्यमंत्रीऐवजी कॅबिनेट मंत्री द्या”, बच्चू कडूंची मागणी; तर मंत्रिपदावरून शिंदे गटात प्रचंड नाराजी
विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटलांचं नाव तर शिंदे गटाकडून दिपक केसरकर यांच्या नावाची चर्चा होती. मात्र आज भाजपने राहुल नार्वेकर यांच्या नावाची घोषणा करत त्यांनी आज त्यासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे ३ ते ४ म्हणजे येत्या रविवार आणि सोमवारी अधिवेशन होणार असून शिंदे सरकारला या अधिवेशनात बहुमत सिद्ध करण्यास राज्यापालांनी सांगितले आहे.
“लक्षात ठेवा.. यापुढेही बराच राजकीय प्रवास करायचा आहे”; राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र
गेल्या एक ते दोन वर्षापासून विधान सभा अध्यक्षांची निवड रखडलेली होती. याकाळात विधानसभा उपाध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते नरहरी झिरवाळ यांनी कारभार सांभाळला होता. अशातच आता शिंदे सरकार अजूनही अपात्रतेची टांगती तलवार आहे. यासंदर्भात तात्काळ सुनावणी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेने सर्वाेच्च न्यायलायत केली होती. मात्र ही मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता ही सुनावणी 11 जुलै रोजीच होणार आहे.
Read also
- उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केली मोठी कारवाई; पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका
- राज्यात शिंदे सरकार येताच शरद पवारांना मोठा धक्का
- “शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी मोठा त्याग केला”
- “तुम्ही म्हणजे मुंबई नाही, अन् महाराष्ट्रही नाही”; आरे कारशेडवरून ठाकरेंना भाजपचा टोला
- विधानसभा अध्यक्षासाठी भाजपकडून नव्या चेहऱ्याला संधी