मुंबई : शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर आता शिवसेनेने मोठं पाऊल उचललं आहे. शि्वसेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्यांकडून आता शिवसेनेशी एकनिष्ठा राहण्यासाठी प्रतिज्ञापत्र लिहून घेतलं जात आहे. यासंदर्भात राज्यातील राजकीय नेत्यांनी शिवसेनेवर टिकास्त्र सोडलं आहे तर शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद यांनी देखील यामध्ये सहभागी होण्याचं कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे.
राज्यात शिंदे सरकार येताच शरद पवारांना मोठा धक्का
दिपाली सय्यद यांनी यासंदर्भात एक पत्र जाहीर केलं आहे त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, जेव्हा जेव्हा आपला महाराष्ट्र संकटात पडला. तेव्हा शिवसेनेचा शिवसैनिक त्या संकटाला नडला. आज शिवसेना संकटातून संघर्ष करते, पक्षश्रेष्ठी व शिवसेनेचे नेते यांच्यात कायदेशीर लढा सुरु आहे. आपणा सगळयांना विनंती आहे की या सर्व संकटातून शिवसेना मार्ग काढेल.
“शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी मोठा त्याग केला”
परंतु शिवसैनिकांनी त्या गोष्टींकडे लक्ष न देता आपली शिवसेना आपल्या विभागासाठी, प्रभागासाठी, गावांसाठी, महाराष्ट्राच्या सेवेसाठी बळकट करा, पुणे असो वा ठाणे, मुंबई असो या नवीमुंबई संपुर्ण महाराष्ट्रत शिवसेनेचा भगवा डौलाने फडकत राहिला पाहीजे. वरीष्ठ पातळीवरच्या राजकारणास दुर्लक्ष करुन शिवसैनिकांनी आपल्या शाखा आणि विभागात जनतेच्या सेवेसाठी उतरावे.
“तुम्ही म्हणजे मुंबई नाही, अन् महाराष्ट्रही नाही”; आरे कारशेडवरून ठाकरेंना भाजपचा टोला
दरम्यान, शिवसेनेच्या कार्यकत्यांना आता प्रतिज्ञापत्र लिहुन द्यावे लागले असल्याने आता मनसेने देखील शिवसेनेवर खोचक प्रतिक्रिया दिली आहे. नवाब सेनेकडून उरलेले खासदार, नगरसेवक, पदाधिकारी आता निष्ठेचं प्रतिज्ञापत्र काढून घेतलं जात आहे. कधी शिवबंधन तर कधी शपथा आणि आता काय ते प्रतिज्ञापत्र. संजय राऊत यांच्या थोबाडाला चिकटपट्टी लावली तरी पुरेसं आहे. म्हणजे हे उद्योग करायची गरज पडणार नाही. अस मनसे नेते गजानन काळे यांनी म्हटलं आहे.
Read also
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना नेतेपदावरून काढल्यावर बंडखोर आमदार आक्रमक
- मुख्यमंत्री पदाची सुत्रे हातात घेताच ‘शिंदें’ अँक्शन मोडवर; भुजबळांनी मंजुर केलेल्या 600 कोटींच्या कामांना लावला ब्रेक
- शिवसेना उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदेंची ? अखेर या प्रश्नावरील पेच सुटला
- विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीसाठी आघाडीकडून मोठी खेळी; शिवसेना आमदारालाच दिली उमेदवारी
- उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केली मोठी कारवाई; पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका