मुंबई : शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर आता शिवसेनेने मोठं पाऊल उचललं आहे. शि्वसेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्यांकडून आता शिवसेनेशी एकनिष्ठा राहण्यासाठी प्रतिज्ञापत्र लिहून घेतलं जात आहे. यासंदर्भात राज्यातील राजकीय नेत्यांनी शिवसेनेवर टिकास्त्र सोडलं आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे नेते गजानन काळे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केली मोठी कारवाई; पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका
शिवसेनेच्या कार्यकत्यांना आता प्रतिज्ञापत्र लिहुन द्यावे लागले असल्याने आता मनसेने देखील शिवसेनेवर खोचक प्रतिक्रिया दिली आहे. नवाब सेनेकडून उरलेले खासदार, नगरसेवक, पदाधिकारी आता निष्ठेचं प्रतिज्ञापत्र काढून घेतलं जात आहे. कधी शिवबंधन तर कधी शपथा आणि आता काय ते प्रतिज्ञापत्र. संजय राऊत यांच्या थोबाडाला चिकटपट्टी लावली तरी पुरेसं आहे. म्हणजे हे उद्योग करायची गरज पडणार नाही. अस मनसे नेते गजानन काळे यांनी म्हटलं आहे.
राज्यात शिंदे सरकार येताच शरद पवारांना मोठा धक्का
दिपाली सय्यद यांनी यासंदर्भात एक पत्र जाहीर केलं आहे त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, जेव्हा जेव्हा आपला महाराष्ट्र संकटात पडला. तेव्हा शिवसेनेचा शिवसैनिक त्या संकटाला नडला. आज शिवसेना संकटातून संघर्ष करते, पक्षश्रेष्ठी व शिवसेनेचे नेते यांच्यात कायदेशीर लढा सुरु आहे. आपणा सगळयांना विनंती आहे की या सर्व संकटातून शिवसेना मार्ग काढेल.
“शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी मोठा त्याग केला”
परंतु शिवसैनिकांनी त्या गोष्टींकडे लक्ष न देता आपली शिवसेना आपल्या विभागासाठी, प्रभागासाठी, गावांसाठी, महाराष्ट्राच्या सेवेसाठी बळकट करा, पुणे असो वा ठाणे, मुंबई असो या नवीमुंबई संपुर्ण महाराष्ट्रत शिवसेनेचा भगवा डौलाने फडकत राहिला पाहीजे. वरीष्ठ पातळीवरच्या राजकारणास दुर्लक्ष करुन शिवसैनिकांनी आपल्या शाखा आणि विभागात जनतेच्या सेवेसाठी उतरावे.
नवाब सेने कडून उरलेले खासदार,आमदार,नगरसेवक,पदाधिकारी यांच्याकडून आता निष्ठेचं प्रतिज्ञापत्र…??
कधी शिवबंधन… तर कधी शपथा आणि आता काय ते प्रतिज्ञापत्र…😅
संजय राऊत यांच्या थोबाडाला चिकटपट्टी लावली तरी पुरेसं आहे… म्हणजे हे उद्योग करायची गरज पडणार नाही…#शिल्लकसेना
— Gajanan Kale (@GajananKaleMNS) July 2, 2022
Read also
- शिवसैनिकांनी आपल्या जनतेच्या सेवेसाठी..;” दिपाली सय्यद यांनी कार्यकर्त्यांना केलं आवाहन
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना नेतेपदावरून काढल्यावर बंडखोर आमदार आक्रमक
- मुख्यमंत्री पदाची सुत्रे हातात घेताच ‘शिंदें’ अँक्शन मोडवर; भुजबळांनी मंजुर केलेल्या 600 कोटींच्या कामांना लावला ब्रेक
- शिवसेना उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदेंची ? अखेर या प्रश्नावरील पेच सुटला
- विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीसाठी आघाडीकडून मोठी खेळी; शिवसेना आमदारालाच दिली उमेदवारी