IMPIMP
jarange-patal-extended-his-stay-in-vashi-which-demands-were-accepted-by-the-government jarange-patal-extended-his-stay-in-vashi-which-demands-were-accepted-by-the-government

“आरक्षणाचा सुर्य उगवला, जरांगे पाटलांच्या लढ्याचं यश,” मुख्यमंत्र्यांसोबतत जरांगे पाटलांची विजयी सभा

मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा आरक्षणाच्या लढ्याला अखेर यश मिळालं आहे. काल रात्री मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. त्यामुळे मुंबईत धडकणारं मराठा वादळ आता वाशीतून माघारी फिरणार आहे. आज जरांगे पाटील यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विजयी सभा होत आहे.

मध्यरात्री तब्बल तीन तास चर्चा झाल्यानंतर सरकारने मनोज जरांगे पाटलांच्या सर्व मागण्यांचे सुधारीत अध्यादेश जारी करून त्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. यासंदर्भात मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज जरांगे पाटील आपलं उपोषण सोडणार आहे.

दरम्यान, मराठा समाजाच्या ५४ लाख नोंदी सापडल्या आहेत. सापडलेल्या नोंदींचं प्रमाणपत्र तातडीने देण्यात यावं. तसंच त्यांच्या कुटुंबियांना ताबडतोब प्रमाणपत्र देण्यात यावेत, असा आपला लढा होता. ही प्रक्रिया सुरू झाली आहे. याबाबतची डाटा सरकार थोड्याच दिवसांत देणार असल्याचे जरांगे पाटलांनी सांगितलं.

ज्यांची नोंद सापडली, त्याच्या सगेसोयऱ्यांनाही प्रमाणपत्र देण्याकरत अध्यादेश पारीत करण्यात आलाय. मराठा समाजाच्या मूळ मागण्या पुर्ण झाल्या आहेत. यावर तीन तास चर्चा झाली. मुंबई हायकोर्टाच्या वरिष्ठ वकिलांनी शब्दन शब्द वाचून खात्री करून घेतली आहे. त्यानंतरच आम्ही बाहेर पडलो. असेही जरांगे पाटील म्हणाले.