मुंबई : जिंकेल त्याची जागा या नियामानुसार महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गटाला सर्वाधिक २१ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर संजय राऊतांनी २३ जागांवर दावा सांगितला आहे. यानुसार मुंबईत ठाकरे गटाला ४ चार जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाने याठिकाणी विशेष लक्ष घातलं आहे. यातच ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांची दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात जाहीर सभा होणार आहे.
हेही वाचा…लहू बालवडकरांच्या वाढदिवसानिमित्त संगीतमय भव्य भजन स्पर्धा ; पुणेकरांना अनुभवायला मिळणार ‘याची देही याची डोळा’
दक्षिण मुंबई मतदारसंघाची जागा ठाकरे गटाला येणार आहे. याठिकाणी सद्या विद्यमान खासदार अरविंद सावंत असून ते ठाकरे गटात आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी अरविंद सावंत यांची निश्चित मानली जात आहे. ही जागा पुन्हा मिळवण्यासाठी ठाकरे गटाने कंबर कसली आहे. त्यामुळे ६ जानेवारील गिरगावांतील प्रभाग क्रमांक १२ च्या वतीने आदित्य ठाकरेंच्या सभेंच आयोजन करण्यात आलं आहे.
हेही वाचा…हे तीन चेहरे डोक्यात साठवून ठेवा.! IIT BHU मधील सामूहिक ब’ला’त्का’र प्रकरण, तिन्ही आरोपी भाजपा आयटी सेलचे सदस्य
दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे गट दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, ईशान्य मुंबई, कोल्हापुर, रत्नागिरी-सिंधूदूर्ग, रायगड, ठाणे, कल्याण-़ डोंबिवली, पालघर, नाशिक, शिर्डी, मावळ, धाराशीव, परभणी, छत्रपती संभाजीनगर, रामटेक, बुलढाणा, हिंगोली, वाशिम-यवतमाळ, हातकणंगले या जागांसाठी ठाकरे गट आग्रही आहे. तर काॅंग्रेसच्या वाट्याला नागपूर, भंडारा-गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, लातूर, नांदेड, जालना, धुळे, नंदूरबार, जळगाव, पुणे, सोलापूर, सांगली, भिवंडी, उत्तर मध्य मुंबई, उत्तर मुंबई या जागेवर आपला उमेदवार देऊ शकतात.
READ ALSO :
हेही वाचा…मिरजेत ठाकरे अन् शिंदे गटाचे शिवसैनिक एकमेकांत भिडले, शिवसेना कार्यालयावरून मोठा राडा
हेही वाचा…“देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यापासून राज्यात गुन्हेगारी वाढली,” सुप्रिया सुळेंची फडणवीसांवर जहरी टिका
हेही वाचा..“एक दुसऱ्याच्या मानेवर बसण्याची गद्दारांची सुरूवात झालीय”, जागावाटपावरून महायुतीत कलह, ठाकरे गटाची जोरदार टिका
हेही वाचा…“त्या” किंकाळ्या इतक्या होत्या की गाव हादरलं होतं”, जरांगे पाटलांनी सांगितल्या ‘त्या’ आठवणी
हेही वाचा..“दादांसोबत नाही म्हणून आता सुप्रिया सुळेंना बारामतीत तळ ठोकावा लागतोय”, रूपाली चाकणकरांनी सुळेंना डिवचलं